नेमकं काय प्रकरण?
हे प्रकरण सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आहे. दिव्यांग असल्याचं सांगत माधुरी कल्याण नष्टे आणि अजय कल्याण नष्टे या दोन अधिकाऱ्यांनी एमपीएससीला गंडवलं, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. हे दोघेही उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. माधुरी नष्टे सातारा येथे उपजिल्हाधिकारी तर अजय नष्टे सांगली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की, या दोघांनीही 80 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. हे प्रमाणपत्र बोगस असून, या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी शासकीय नोकरी मिळवण्याचा वडेट्टीवार यांचा दावा आहे.
advertisement
अजय नष्टेंचं काय स्पष्टीकरण:
सातारा उपजिल्हाधिकारी अर्चना कल्याण नष्टे आणि सांगली उपजिल्हाधिकारी अजय कल्याण नष्टे यांच्यावर दोघांनीही खोटे दिव्यांग प्रमाणपत्र आधारावर सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला. मात्र, नष्टे भाऊ आणि बहिणींनी हे सर्व आरोप फेटाळून लावत केवळ व्यक्ती द्वेषातून कुटुंबियांची बदनामी केल्याचा आरोप करत सर्व संशय फेटाळून लावले आहेत.
याबाबत खुलासा करताना जतचे उपविभागीय अधिकारी अजय नष्टे म्हणाले, "सध्या मी उपविभागीय अधिकारी जत या पदावर कार्यरत आहे. मी व माझी मोठी बहीण अर्चना नष्टे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याची बातमी आली आहे. सदरची बातमी आणि माहिती अत्यंत चुकीची आहे. स्वतः राज्यसेवा 2017 या परीक्षेत राज्यात चौथ्या क्रमांकाने पास झालो आहे. स्वतः खुल्या प्रवर्गातून पद मिळवले आहे. माझी बहिण अर्चना कल्याण नाष्टे हिला 2014 ओबीसी प्रवर्गातून पद मिळालं आहे. मी आणि माझी बहिण दोघांनी ही कोणत्याही प्रकारचे दिव्यंग प्रमाणपत्र काढलेले नाही अशा पद्धतीने कोणतीही वर्तवणूक माझ्या कुटुंबियांकडून झाली नाही. काही लोकांनी वैयक्तिक करणातून आणि व्यक्ती द्वेषातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र,त्या तक्रारीवरून झालेल्या चौकशीत कोणतेही तथ्य आढळले नाही माझ्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी रचलेल हे षडयंत्र आहे."
खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती:
वादादीत आयएएस अधिकारी पूजा खेडकरने देखील असाचा काहिसा प्रकार केला आहे. आता युपीएससीने देखील पूजा खेडकरवर गुन्हा दाखल केला आहे. खेडकर कुटुंबीयांनी बरीचशी माया जमवल्याचं देखील तपासातून समोर आलं होतं. आता सांगली आणि साताऱ्यातील या नष्टे प्रकरणात नेमकं काय समोर येतंय, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
