हत्या करण्यापूर्वी जादूटोण्याचा प्रयोग
सतीश वाघ यांचं मांजरी परिसरातून अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर तब्बल 14 तासानंतर उरूळी कांचनच्या घाटात त्यांचा मृतदेह सापडला होता. हत्येची सुपारी दिल्यानंतर मारेकऱ्यांनी सतीश वाघ यांना 72 वेळा चाकूने भोसकलं, तसंच त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापला होता. तसेच हत्येपूर्वी आरोपींनी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचं देखील समोर आलंय. पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. पत्नी आणि प्रियकराने हत्या करण्यापूर्वी जादूटोण्याचा प्रयोग केल्याच तपासात उघड झाल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
advertisement
विवाहबाह्य संबंध
सतीश वाघ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर याच्याशी सतीश वाघ यांच्या पत्नीशी असलेले विवाहबाह्य संबंध हे या हत्येमागंचं प्रमुख कारण आहे, अशी माहिती देखील समोर आली होती. माझा पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते. माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ करत होता, असा आरोप सतीश वाघ यांच्या पत्नीने केला होता.
9 डिसेंबरला नेमकं काय झालं होतं?
दरम्यान, 9 डिसेंबरला सतीश वाघ यांनी शेवाळवाडीतून मॉर्निंग वॉकला सुरूवात केली. यानंतर हॉटेल ब्लू बेरीजवळ सतीश वाघ थांबले, तेव्हा कारमधून चौघेजण उतरले आणि त्यांनी सतीश वाघ यांचं कारमध्ये डांबून अपहरण केलं. या चौघांनी सोलापूर मार्गाच्या दिशेने कार पुढे नेली. यानंतर 9 डिसेंबरच्याच संध्याकाळी शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता.
