सेबी 2025 'अधिकारी ग्रेड ए' (सहाय्यक व्यवस्थापक) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे जनरल, लीगल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिसर्च, ऑफिशियल लँग्वेज, इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) आणि इंजिनिअरिंग (सिव्हिल) यांसारख्या विविध विभागांमध्ये रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. ही भरती एकूण 110 रिक्त जागांसाठी होत आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून अर्ज शुल्क भरण्यासाठीही तेव्हापासूनच सुरूवात होणार आहे.
advertisement
दरम्यान, सेबीमध्ये केल्या जाणाऱ्या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक 30 ऑक्टोबर 2025 रोजी https://www.sebi.gov.in/index.html या वेबसाईटवर उपलब्ध होईल. जनरल 56, लीगल 20, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 22, रिसर्च 4, ऑफिशियल लँग्वेज 3, इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) 2 आणि इंजिनिअरिंग (सिव्हिल) 3 या विविध विभागांमध्ये पदांसमोर नमूद करण्यात आलेल्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. सेबीच्या भरतीची जाहिरातीच्या PDF साठी इथे क्लिक करा. खुला प्रवर्ग, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग श्रेणीसाठी, अर्ज शुल्क आणि सूचना शुल्कासह 18% जीएसटी मिळून 1000 रुपये शुल्क असेल. अनुसूचित जाती- जमाती आणि शारिरीक दृष्ट्या दुर्बळ उमेदवारांसाठी, सूचना शुल्कासह 18% जीएसटी मिळून 100 रुपये शुल्क असेल.