शेगाव संत नगरीत चौघे दादागिरी करीत होते. आपल्या नावाची दहशत राहावी, लोकांनी आपल्याला घाबरावे यासाठी चौघे जण सतत या ना त्या कारणाने सामान्यांना त्रास देत होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
बुलडाणा जिल्ह्यातील संत नगरी म्हणजेच शेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत पसरवित होते. त्यामुळे संत नगरीला कलंकित व्हावे लागते होते. मात्र त्यावर उपाय म्हणून पोलिसांनी शेगावमध्ये दहशत पसरविणाऱ्या चार जणांना ताब्यात घेऊन त्यांना चांगलीच अद्दल घडावी, यासाठी चौघांची धिंड काढली. शेगाव शहरातून त्यांची धिंड काढण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.
advertisement
Location :
Shegaon,Buldana,Maharashtra
First Published :
Oct 12, 2025 10:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिथे दहशत पसरवली, तिथेच पोलिसांनी माज मोडला, भाई-दादांवर तोंड लपवण्याची वेळ
