TRENDING:

आईच्या निधनानंतर लेकीनं सुरू ठेवली रमजानची प्रथा; मुंबईत विकते 'हा' स्पेशल पदार्थ

Last Updated:

आई आणि मुलीचं नातं हे किती जिव्हाळ्याचं असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहितं आहे. लेक म्हणजे आईसाठी काळजाचा तुकडा असतो. तिचं आई गेल्यानंतर तिला कोणत्याना कोणत्या रुपात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक लेकीचा प्रयत्न असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : रमजानचा महिना हा मुस्लिम बांधवांसाठी फारच पवित्र महिना असतो. या महिन्यात सगळ्यात जास्त गर्दी पाहायला मिळते मस्जिद बंदर रोडवरील मोहम्मद अली गल्लीमध्ये. याठिकाणी व्हेजपासून नॉनव्हेजपर्यंत सगळ्या प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात. विशेष म्हणजे काही पदार्थ हे तर फक्त रमजानच्याच महिन्यात पाहायला मिळतात. या सगळ्या वेगवेगळ्या पदार्थांची चव घ्यायला खवय्यांची प्रचंड गर्दी असते.

advertisement

याच गर्दीत शेरवाणू चौहान नावाची एक मुलगी भांडोली नावाच्या पदार्थाचा स्टॉल लावते. भांडोली हा पदार्थ मिनारी मस्जिदचा फेमस पदार्थ असल्याचं म्हटलं जातं. पण शेरवाणू हा भांडोलीचा स्टॉल हा फक्त रमजानचा महिना आहे म्हणून लावत नाही तर याच मुख्य कारण म्हणजे तिची आई आहे.

शेरवाणूची आई रोज याच ठिकाणी भांडोलीचा स्टॉल लावायची. पण त्यांच्या निधनानंतर हे सगळंच थांबलं. शेरवाणूने मात्र आईची आठवण म्हणून हा भांडोलीचा स्टॉल पुन्हा सुरू करायचं ठरवलं. अगदी आईसारखं रोज त्याच ठिकाणी जरी स्टॉल लावायला जमणार नसलं तरी रमजानच्या महिन्यात तरी आईची आठवण म्हणून ती हा स्टॉल त्याच ठिकाणी लावते. या भांडोलीची किंमत आहे 20 आणि 30 रुपये इतकी आहे.

advertisement

भांडोली कशी तयार केली जाते?

तांदळाचं पिठ, मावा, अंड, नारळाचं दूध यांचं सगळं एकत्रित मिश्रण करून ते डोशाच्या पिठाप्रमाणे थोडं पातळं स्वरुपात तयार केलं जातं. त्यानंतर तव्यावर तेल किंवा तूप सोडून हे पीठ पसरवून स्पंजी डोशासारखं ते जाडं आणि प्लंपी बनवलं जातं. भांडोली हा पदार्थ मिनारा मस्जिदचा प्रसिद्ध पदार्थ असल्याचं म्हटलं जातं.

advertisement

गरोदरपणात सॉफ्ट ड्रिंक पिताय? त्वरित व्हा सावध, अन्यथा बाळावर होतील भयंकर दुष्परिणाम, पाहा VIDEO

आई असताना आम्हीपण आईसोबत स्टॉलवर असायचो. भांडोलीची रेसिपी आईनं आम्हाला शिकवली आहे. त्यामुळे तिच्यासारखं बनवण्याचा मी प्रयत्न करते, असं म्हणत शेरवाणूनं आईच्या आठवणींना उजाळा दिला. एवढचं नाही तर आईचा आशिर्वाद नेहमी आपल्यासोबत राहावा म्हणून तिने आपल्या स्टॉलवर आईसोबतच एक फोटोही लावला आहे. स्टॉलवर भांडोली बनवतानाचा आईचा हा फोटो आहे.

advertisement

आई आणि मुलीचं नातं हे किती जिव्हाळ्याचं असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहितं आहे. लेक म्हणजे आईसाठी काळजाचा तुकडा असतो. तिचं आई गेल्यानंतर तिला कोणत्याना कोणत्या रुपात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक लेकीचा प्रयत्न असतो. तोच प्रयत्न शेरवाणूनेही केला. तिने आपल्या आईच्या हातची भांडोलीची रेसिपी शिकून त्या स्वरुपात आईला आपल्यात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि रमजानला आईच्याच ठिकाणी भांडोलीचा हा स्टॉल लावून तिचा आशिर्वाद आणि आठवणी जिवंत ठेवल्या आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईच्या निधनानंतर लेकीनं सुरू ठेवली रमजानची प्रथा; मुंबईत विकते 'हा' स्पेशल पदार्थ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल