गरोदरपणात सॉफ्ट ड्रिंक पिताय? त्वरित व्हा सावध, अन्यथा बाळावर होतील भयंकर दुष्परिणाम, पाहा VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Latika Amol Tejale
Last Updated:
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे सतत काही थंड पिण्याची इच्छा सर्वांचीच होते. मात्र, या गरोदरपणात सोडा किंवा इतर अधिक साखर असलेले पेय प्यायल्यास आई आणि विकसनशील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
लतिका अमोल तेजाळे, प्रतिनिधी
मुंबई : एखाद्या महिलेसाठी गरोदर होणे, ही भावना सर्वात सुखद आणि आनंददायी असते. सध्या काही महिलांना प्रेगनन्सीसाठी समस्या जाणवतात. त्यामुळे काही महिलांना खूप प्रयत्नांनंतर आई होण्याचं सुख मिळणार असतं. या सगळ्या प्रवासात आपण आपल्यासोबत आपल्या आत वाढत असलेल्या जीवाची खूप जास्त काळजी घ्यायला हवी. लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष न करता आपल्या बाळासाठी काय उत्तम असेल, याकडे लक्ष असणे गरजेचे असते.
advertisement
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे सतत काही थंड पिण्याची इच्छा सर्वांचीच होते. मात्र, या गरोदरपणात सोडा किंवा इतर अधिक साखर असलेले पेय प्यायल्यास आई आणि विकसनशील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही पेय प्यायल्याने आई आणि होणाऱ्या बळावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18च्या टीमने आहारतज्ज्ञ आरती भगत यांच्याशी संवाद साधला.
advertisement
यावेळी त्यांनी सांगितले की, शक्यतो गरोदरपणात सॉफ्ट ड्रिंक, सोडा, एनर्जी ड्रिंक पिणे टाळावे. कारण ही पेय पिल्यास आई आणि विकसनशील बाळावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. कुठलेही सॉफ्ट ड्रिंक पिल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. अगदी मधुमेह नसला तरी गरोदरपणात साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते.
अनेक गुन्हे दाखल, तब्बल 7 वर्षांपासून तुरुंगात, माफिया डॉन मुख्तार अन्सारीबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील..
गरोदरपणाच्या सुरुवातीलाच हे पेय पिण्यास टाळावे. कारण पहिल्या 8 आठवड्यातच बाळाचे अवयव म्हणजेच हृदय, किडनी, मेंदू तयार होण्यास सुरुवात होते. या काळात सॉफ्ट ड्रिंक पिल्यावर त्याचा बाळाच्या विकासावर परिणाम होतो. बाळाचे अवयव व्यवस्थित विकसित होत नाही. याचे दुष्परिणाम बाळाला भविष्यात अनुभवावे लागतील.
advertisement
काही सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कॅफेनचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते प्लॅसेंटामार्फत बाळापर्यंत पोहोचते. परिणामी बाळाचे वजन कमी राहते. सोबतच साखरेचे जास्त प्रमाण असल्यामुळे बाळाला जन्मतःच मधुमेह देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो अशी हानिकारक पेय पिण्यास टाळावी, अशी माहितीही आहारतज्ञ आरती भगत यांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 29, 2024 11:24 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
गरोदरपणात सॉफ्ट ड्रिंक पिताय? त्वरित व्हा सावध, अन्यथा बाळावर होतील भयंकर दुष्परिणाम, पाहा VIDEO