हॉटेलच्या लिफ्टमध्ये बळजबरी शिरली अन्.., बड्या बिल्डरच्या पोराला अडकवलं जाळ्यात, दोघींचा डाव परफेक्ट बसला पण...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
गोरेगाव येथील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन १० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन महिलांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई: गोरेगाव येथील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन १० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन महिलांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हेमलता पाटकर (३९) आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस (३३) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे असून, लोअर परळ भागात दीड कोटी रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं.
नेमकी काय आहे घटना?
गोरेगाव येथील 'गोयल अँड सन्स इन्फ्रा एलएलपी'चे मालक असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने १४ नोव्हेंबर रोजी आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त आंबोली येथील एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. १५ नोव्हेंबरच्या पहाटे, व्यावसायिकाचा मुलगा आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत आणि मित्रांसह लिफ्टने खाली उतरत होता. त्याचवेळी एक महिला जबरदस्तीने लिफ्टमध्ये शिरली. लेझर लाईटच्या कारणावरून या महिलेने जाणीवपूर्वक वाद उकरून काढला आणि लिफ्टमध्येच राडा केला.
advertisement
पद्धतशीर रचला कट
या वादानंतर संबंधित महिलेने बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गंभीर आरोप करत आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच, हेमलता पाटकर आणि अमरीना फर्नांडिस यांनी बांधकाम व्यावसायिकाशी संपर्क साधला. दाखल केलेली तक्रार मागे घ्यायची असेल, तर १० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
advertisement
साडेपाच कोटींत ठरला 'सौदा'
अखेर अनेक वाटाघाटींनंतर साडेपाच कोटी रुपये देण्याचं ठरलं. दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाने या प्रकरणाची माहिती मुंबई गुन्हे शाखेला दिली. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने तक्रारीची गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला. लोअर परळ येथे दीड कोटी रुपयांचा पहिला हप्ता घेण्यासाठी या दोघी आल्या असता, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
advertisement
पोलीस कोठडीत रवानगी
या महिलांनी अशाच प्रकारे अन्य कुणाला फसवले आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. अटकेनंतर या दोघींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे मुंबईतील व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, 'हनी ट्रॅप' किंवा खोट्या गुन्ह्यांच्या धाकाने खंडणी उकळणारी टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 2:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हॉटेलच्या लिफ्टमध्ये बळजबरी शिरली अन्.., बड्या बिल्डरच्या पोराला अडकवलं जाळ्यात, दोघींचा डाव परफेक्ट बसला पण...








