अनेक गुन्हे दाखल, तब्बल 7 वर्षांपासून तुरुंगात, माफिया डॉन मुख्तार अन्सारीबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
माफिया डॉन मुख्तार अन्सारी पोटात गॅस आणि युरिन इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्याला कडेकोट बंदोबस्तात वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.
विकाश कुमार, प्रतिनिधी
बांदा : उत्तरप्रदेशातील माफिया डॉन मुख्तार अंसारी याचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो बांदा येथे तुरुंगात बंद होता. माफिया मुख्तार अंसारी याची तब्येत खराब झाल्यानंतर त्याला बांदा येथील मेडिकल कॉलेजमध्ये आणले गेले होते. याठिकाणी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर संपूर्ण बांदा मेडिकल कॉलेजचे छावणीत रूपांतर झाले आहे. यासोबतच मऊ आणि गाझीपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
advertisement
मागील जवळपास 7 वर्षांपासून माफिया डॉन मुख्तार अन्सारी हा बांदा तुरुंगात बंद होता. मुख्तार अन्सारी याच्यावर सुमारे 65 खटले दाखल झाले होते. त्यापैकी 21 प्रकरणांची सुनावणी विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. तसेच मुख्तारला न्यायालयाने आठ प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली होती. याची शिक्षा तो तुरुंगात भोगत होता.
advertisement
पोटात गॅसचा त्रास -
असे सांगितले जात आहे की, माफिया डॉन मुख्तार अन्सारी पोटात गॅस आणि युरिन इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्याला कडेकोट बंदोबस्तात वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. दरम्यान, काल रात्री उशिरा कारागृहातील माफिया मुख्तार अन्सारी याला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात आणले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
5 डॉक्टरांची समिती व्हिडिओग्राफीद्वारे करणार शवविच्छेदन -
माफिया डॉन मुख्तार अंसारी याच्या मृत्यूनंतर बांदा मेडिकल कॉलेजमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दाखल झाले आहेत. तसेच एसएसबी फोर्स आणि पोलीस बंदोबस्त तैनात करून मेडिकल कॉलेजचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. मुख्तारच्या मृत्यूनंतर मुख्तारचे कुटुंबीय गाझीपूरहून बांदा येथे रवाना झाले आहेत. मृत मुख्तार अन्सारीचे शवविच्छेदन त्याचा अन्सारीच्या कुटुंबासमोर 5 डॉक्टरांचे पॅनेल व्हिडिओग्राफीद्वारे करणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
March 29, 2024 8:45 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
अनेक गुन्हे दाखल, तब्बल 7 वर्षांपासून तुरुंगात, माफिया डॉन मुख्तार अन्सारीबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील..