तुळशीबागेत अवतरलं 'वृंदावन', मानाचा चौथा गणपती ठरतोय भाविकांसाठी आकर्षण
महापे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना शिळ फाटा ब्रिजवरून कल्याण फाटा- पनवेलमार्गे वळवले आहे. नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना ब्रिजवरून सोडण्यात येत आहे. तर, शिळ फाटा ब्रिज खालून कमी जड असणार्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. सध्या गणेशोत्सवामुळे अनेक अवजड वाहनांना वेगवेगळ्या महामार्गांवरून बंदी आहे. त्यामुळे अनेक वाहनांना रस्त्याच्या कडेला थांबवलं असून अनेक वाहनांना पर्यायी ठिकाणी त्यांची पार्किंग करण्यात आली होती.
advertisement
Morya: आपण गणपती बाप्पा ‘मोरया’ असंच का म्हणतो? 99 टक्के लोकांना हे माहितच नाही!
शिळफाट्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्यामुळे प्रवाशांनी शक्य तिथे पर्यायी मार्गाचा वापर केला आहे. शिळफाट्याप्रमाणेच ठाण्यातल्याही अनेक मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे. गायमुख घाटात अवजड वाहनांचा मोठ्या प्रमाणात ये- जा असल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.