मतदानाच्या दिवशी दोन्ही पक्षांकडून आलेल्या तक्रारींनंतर महाड शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रवादी कार्यकर्ते सुशांत जाबरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी या दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन त्यातून लाठ्या आणि काठ्या असा संशयास्पद साहित्य जप्त केले होते.
advertisement
पिस्तुलचं जम्मू-काश्मीर कनेक्शन, मालक कोण?
हा राडा सुरू असताना विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांनी जप्त केलेले पिस्तुल पोलिसांना दिले होते. निवडणूक कालावधीत शस्त्र बाळगण्यावर कठोर निर्बंध असतानाही ही पिस्तूल घटनास्थळी कशी आली, याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे ही पिस्तूल जम्मू–कश्मीरमध्ये नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली. या पिस्तुलचा मालक राजस्थानमधील रहिवाशी असल्याचे तपासात समोर आले आहे. तो मागील दोन–तीन दिवसांपासून महाडमध्ये उपस्थित होता, मात्र याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना नव्हती, अशी माहिती महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनी दिली.
पोलिसांनी सर्व संबंधित कार्यकर्त्यांची चौकशी सुरू केली असून, निवडणूक प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महाडमधील या घटनेमुळे निवडणूक वातावरणात तणाव निर्माण झाला असून, आगामी तपासातून अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
२४ नगर परिषदांच्या निवडणुका २० डिसेंबर रोजी...
सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
