धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जात असलेल्या शिवसेनेत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे. एकीकडे धाराशिवचे शिवसेनेचे संपर्कमंत्री राजन साळवींना शिवसैनिकांनी घातलेला घेराव,शिवसैनिकांशी त्यांची झालेली वादावादी तर दुसरीकडे धाराशिव दौऱ्यावर असलेल्या प्रताप सरनाईक यांच्यासमोर शिवसैनिकांकडून घोषणाबाजी आणि गोंधळाची घटना घडल्या आहेत.
धाराशिवचं राजकीय वातावरण तापलं
जिल्हा परिषदेत शिवसेनेत झालेले तिकीटवाटप...शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपच्या आमदाराच्या मुलाकडून एबी फॉर्म वाटप केलं जात असल्याचा आरोप करणारी ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. युवा सेनेच्या पदाधिकारी अविनाश खापे याने या ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आरोपामुळं धाराशिवचं राजकीय वातावरण तापलं.
advertisement
जिल्हा परिषदेत तिकीट वाटपात घोळ
दरम्यान जिल्हा परिषदेत तिकीट वाटपात घोळ झाल्याची कबुली प्रताप सरनाईक आणि राजन साळवींनी दिली आहे. या चुकीच्या तिकीट वाटपाचं खापर या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेचे नेते अजित पिंगळे यांच्यावर फोडलं आहे. दरम्यान, अजित पिंगळे यांच्या समर्थकांनी पुढे येत या प्रकरणात भूमिका मांडली आहे.
आगामी निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता
धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. मात्र या युतीला जागावाटपावरून वाद निर्माण झाला आहे, आता या गोंधळावर जागेच्या अदलाबदलीचा उपाय प्रताप सरनाईकांनी सुचवलाय. धाराशिवमध्ये शिवसेनेतल्या या तिकीट वाटपावरून झालेल्या गोंधळाची गाजत आहे. तिकीट वाटपात घोळाच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा :
