ZP निवडणुकीसाठी ठाकरे-शिंदे एकत्र, दोन ठिकाणी युती, राजकारणातील मोठी घडामोड!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी आणि अनपेक्षित राजकीय हालचाल घडली आहे. इथं बार्शीनंतर आता माढ्यात देखील शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी आणि अनपेक्षित राजकीय हालचाल घडली आहे. इथं बार्शीनंतर आता माढ्यात देखील शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी माढ्यात चक्क दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येत आपली युती जाहीर केली आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे नवीन राजकीय समीकरण तयार करण्यात आलं आहे.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार असा मोठा संघर्ष बघायला मिळाला होता. पण आता माढ्यात हे सर्व गट एकत्र आले आहेत. इथं शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती केली आहे.
advertisement
भाजपच्या पॅनलला पराभूत करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांनी ही 'विशेष युती' उभी केली असून, यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. या नव्या युतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उद्या माढ्यातील रांझणी येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शक्तिप्रदर्शनामुळे माढ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
advertisement
बार्शी पॅटर्नची पुनरावृत्ती
काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या बार्शीमध्येही अशाच प्रकारे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत भाजपविरोधात आघाडी उघडली होती. आता तोच 'बार्शी पॅटर्न' माढ्यातही पाहायला मिळत आहे. पक्षाचे झेंडे आणि विचार बाजूला ठेवून केवळ भाजपला रोखणे, हाच या युतीचा मुख्य अजेंडा असल्याचं दिसत आहे.
Location :
Barshi,Solapur,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 12:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP निवडणुकीसाठी ठाकरे-शिंदे एकत्र, दोन ठिकाणी युती, राजकारणातील मोठी घडामोड!









