TRENDING:

Uddhav Thackeray Raj Thackeray: BMC आधी सर्वात धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस वेगळं लढल्यानं फायदाच फायदा!

Last Updated:

BMC Election : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांआधीच नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

advertisement
मुंबई : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांआधीच नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसने स्वबळावरील निवडणुकीची घोषणा करताना दुसरीकडे समविचारी आणि आंबडेकरी पक्षांसोबत चर्चेचा मार्ग मोकळा ठेवला आहे. मुंबई महापालिका निवडणुकी आधी आलेल्या निकालांनी ठाकरे बंधूंना रेड अलर्ट दिला आहे.
BMC आधी सर्वात धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस वेगळं लढल्यानं फायदाच फायदा!
BMC आधी सर्वात धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस वेगळं लढल्यानं फायदाच फायदा!
advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू येणार एकत्र आहेत. मात्र, त्याआधीच राजकीय गणितांच्या जुळवाजुळवीला मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथ नगर परिषदेत उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र आले. मात्र, राजकीय अवकाशाच्या शोधात असलेल्या ठाकरे बंधूंना धक्का बसला आहे. तर, दुसरीकडे स्वतंत्र लढणाऱ्या काँग्रेसला मोठा फायदा झाला आहे.

>> अंबरनाथमध्ये ठाकरे बंधूंचं गणित फसलं...

advertisement

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान शिवसेनेत फूट पाडली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या भागात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. बहुतांशी पदाधिकारी हे शिंदेंसोबत गेले. त्यामुळे ठाकरे गट चांगलाच खिळखिळा झाला. तर, दुसरीकडे अंबरनाथ आणि जवळच्या भागात मनसेदेखील आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात होती.

उद्धव आणि राज एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अंबरनाथमध्ये मनसेच्या उमेदवारांनी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथमधील कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश देत अधिकृतपणे निवडणूक लढवण्यास मनाई केली होती. मनसेची अधिकृत उमेदवारी कोणालाही दिली जाणार नाही. इच्छुकांनी अपक्ष म्हणून लढायचे किंवा आपापल्या राजकीय गणितांनुसार निर्णय घ्यायचा, अशी मुभा देण्यात आली होती. त्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या मनसैनिकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मनसेचे 14 उमेदवार मशाल चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात होते.

advertisement

>> काँग्रेसला फायदा...

काँग्रेसने अंबरनाथ नगर परिषदेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अंबरनाथमध्ये काँग्रेसची काही प्रमाणात ताकद आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे आणि भाजप-शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने काँग्रेसला फायदा झाला. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली. काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळाला आहे.

>> मुंबईत काय होणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

काँग्रेसने अंबरनाथसह राज्यात मविआत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल. तर, दुसरीकडे मात्र, ठाकरे गट आणि मनसे यांना चुकांची पुनरावृत्ती टाळता येणार आहे. मुंबई, ठाण्यात ठाकरे गट आणि मनसेची चांगली ताकद असून संघटना बांधणी देखील उत्तम आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये गणित फसलं असली तरी मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी वेगळ्या रणनीतिने दोन्ही पक्ष सामोरे जाण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Raj Thackeray: BMC आधी सर्वात धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस वेगळं लढल्यानं फायदाच फायदा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल