TRENDING:

Maharashtra Govt Formation Shrikant Shinde : शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदी? श्रीकांत शिंदेंनी अखेर मौन सोडले, म्हणाले, ''माझ्यासाठी...''

Last Updated:

Maharashtra Deputy Chief Minister : शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चांवर श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यात विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र,त्यानंतरही महायुतीने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केला नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये खाते वाटपावरून तिढा असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर, दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चांवर श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडले आहे.
शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदी? श्रीकांत शिंदेंनी अखेर मौन सोडले, म्हणाले, ''माझ्यासाठी...''
शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदी? श्रीकांत शिंदेंनी अखेर मौन सोडले, म्हणाले, ''माझ्यासाठी...''
advertisement

विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला तरी स्थापनेचा दावा अद्याप करण्यात आला नाही. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली. त्यानंतर आता सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे संभाव्य मंत्री कोण असणार याचीदेखील चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेकडून उपमु्ख्यमंत्री म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटले.

advertisement

श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटले?

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Govt Formation Shrikant Shinde : शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदी? श्रीकांत शिंदेंनी अखेर मौन सोडले, म्हणाले, ''माझ्यासाठी...''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल