TRENDING:

Solapur: सोलापूरकरांवर आता नवं संकट, पाण्यामुळे घरात शिरले साप, VIDEO आला समोर

Last Updated:

 सोलापुरात मागील काही दिवसांपासून पूरपरिस्थिती आहे. अनेक गावांना सीना नदीच्या पाण्याने वेढा दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रितम पंडित, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : सोलापूरमध्ये पावसाने धुमशान घातलं आहे. मागील ४ दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागात पावसाचं रौद्ररुप पाहण्यास मिळालं. सीना नदीला पूर आला आहे. शेती, रस्ते पाण्याखाली गेली आहे. आता पावसाचा जोर ओसरल्यानंतर नवीन संकट लोकांसमोर उभं ठाकलं आहे. साप आणि इतर प्राणी आता लोकांच्या घरात येत असल्याचं समोर आलं आहे.

advertisement

सोलापुरात मागील काही दिवसांपासून पूरपरिस्थिती आहे. अनेक गावांना सीना नदीच्या पाण्याने वेढा दिला आहे. या पुराच्या पाण्यात अनेकांच्या घरात साप येतं असल्याचे दिसून येतं आहे. पुराच्या पाण्यात साप घरांपर्यंत पोहोचले आहे. अनेकांच्या घरात साप आढळून आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान शुक्रवारी सर्प दंशाने सोलापुरात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालंय.

advertisement

दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात साळींदर प्राणी आढळून आला. पाण्याच्या भीतीने साळींदर रस्त्यावर आला होता. अचानक रस्त्यावर साळींदर आल्यामुळे लोकांनी वाहतूक थांबवली होती. घटनेची माहिती वन्य अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. पण त्याआधीच एका वन्यजीव प्रेमी तरुणाने प्लास्टिक टोपल्याच्या मदतीने साळींदरला सुखरूपपणे पकडलं. त्यानंतर या साळींदरला सुरक्षित स्थळी वन्यजीवप्रेमींनी सोडून दिलं..

advertisement

गावात पाण्याचा वेढा वाढल्याने नदीत असलेले साप तर वाहून येतायत मात्र विषारी साप देखील सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात लोकांच्या घरात घुसतायत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: सोलापूरकरांवर आता नवं संकट, पाण्यामुळे घरात शिरले साप, VIDEO आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल