सोलापूर शहरातील कोतंम चौकातून शेळगी या ठिकाणी जाण्यासाठी अंजली अजय देशमुख रिक्षा चालक हरीश सय्यद जहागिरदार यांच्या रिक्षामध्ये बसले होते.
प्रशासकीय इमारतींसाठी उपमुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा आदेश; म्हणाले...
महिला प्रवाशिनी रिक्षातून घरी गेल्यावर लक्षात आले की आपली बॅग दिसत नाही आणि त्या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने,रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती.अचानक बॅग न सापडल्याने अंजली देशमुख यांच्यावर चिंता आणि काळजीचे ढग दाटले होते.
advertisement
तर दुसरीकडे रिक्षा चालकाने रिक्षामध्ये महिला प्रवासाची बॅग सापडल्यावर रिक्षाचालक हरीश सय्यद यांनी सोलापुरातील प्रहार संघटनेचे शहर संपर्कप्रमुख जमीर शेख यांना संपर्क केला असता तेव्हा त्या रिक्षा चालकांनी जमीर शेख यांच्या सल्ल्याने व त्यांच्या सोबत वेळ न लावता लगेच जेलरोड पोलीस स्टेशन ला जाऊन त्यांनी त्या पहिला प्रवाशाची बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली.
मुंबईच्या पर्यटनाला चालणा देण्यासाठी मंत्र्यांची अनोखी शक्कल...
त्यानंतर बॅगेत सापडलेल्या कागदपत्राच्या आधारे त्या महिलेचा शोध घेऊन मौल्यवान वस्तू असलेली बॅग पोलिसांच्या महिला प्रवासी अंजली देशमुख यांच्याकडे परत केली. अंजली यांना बॅग मिळतात अश्रू अनावर झाले. व रिक्षा चालकाचे दोन्ही हात जोडून आभार मानले.
हरीश सय्यद यांच्या या प्रामाणिक वर्तनामुळे केवळ अंजली देशमुख यांना दिलासा मिळाला नाही,तर संपूर्ण समाजात एक सकारात्मक संदेश पसरला असून सर्वत्र रिक्षाचालक हारीश सय्यद यांचे कौतुक होत आहे. रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी सुद्धा रिक्षाचालकास कौतुकाची थाप दिली.