Mumbai News : मुंबईच्या पर्यटनाला चालणा देण्यासाठी मंत्र्यांची अनोखी शक्कल, या मार्गांवर सुरू करणार 'जॉय मिनी ट्रेन'
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Mumbai News : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
मुंबई, दि. १७ : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. महाबळेश्वर- तापोळा, कोयनानगर-नेहरूनगर या दोन 'जॉय मिनी ट्रेन' सुरू करण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मेघदूत शासकीय निवासस्थान येथे 'जॉय मिनी ट्रेन' सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, देशात महत्वाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि पर्यटन स्थळांचे कमी वेळेत भ्रमण करून देणाऱ्या 'जॉय मिनी ट्रेन' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे. हा उपक्रम राज्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळावर सुरू करण्यात यावा. राज्यात माथेरानच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू करण्यासाठी सर्व स्थानिक विविध परवाने घेणे, सर्व तांत्रिक बाबी तसेच या उपक्रमातून आर्थिक नफा तपासून या उपक्रमाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. कमी खर्चात अत्यंत आकर्षक पद्धतीने हा उपक्रम कसा सुरू करता येईल याची विभागाने खात्री करून घ्यावी, असे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 6:29 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mumbai News : मुंबईच्या पर्यटनाला चालणा देण्यासाठी मंत्र्यांची अनोखी शक्कल, या मार्गांवर सुरू करणार 'जॉय मिनी ट्रेन'