सोलापूर : महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरच्या एका चित्रकाराने चक्क शर्टाच्या बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारून अनोखी मानवंदना दिली आहे. ही प्रतिमा साकारण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागला, किती शर्टाचे बटन वापरण्यात आले? या संदर्भात अधिक माहिती चित्रकार विपुल मिरजकर यांनी Local 18 शी बोलताना दिली.
advertisement
सोलापुरात छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. 21000 शर्टच्या बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारून ही मानवंदना देण्यात आली आहे. सोलापूरचा सुप्रसिद्ध कलाकार विपुल मिरजकर याने ही प्रतिमा साकारली आहे.
एक शिवभक्त असाही, सर्वात मोठा सण शिवाजी महाराजांसोबत करतो साजरा, Video पाहून कराल कौतुक
ही प्रतिमा साकारण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागलेला असून विविध रंगांच्या शर्टच्या बटनांचा वापर ही प्रतिमा साकारण्यासाठी करण्यात आला आहे. 4 × 5 फूटची ही कलाकृती आहे. ही कलाकृती साकारत असताना विपुल मिरजकर यांच्या आईने सुद्धा मदत केलेली आहे. तसेच या कलाकृतीसाठी बसवराज कडगंची आणि पंकज शहा यांनी देखील सहकार्य केले आहे.
4 हजार नाण्यांपासून साकारली होती महात्मा गांधींची प्रतिमा
दरम्यान, चित्रकार विपुल मिरजकर यांनी अनोख्या पद्धतीने महात्मा गांधी यांची प्रतिमा काही महिन्यांपूर्वी साकारली होती. चित्रकार विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय नाण्यांपासून महात्मा गांधींची प्रतिमा साकारली होती. ही प्रतिमा साकारण्यासाठी एक रुपया, दोन रुपये या भारतीय नाण्यांचा वापर करण्यात आला आहे. एकूण 4 हजार नाण्यांपासून ही महात्मा गांधी यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. 8 बाय 8 या आकाराची प्रतिमा साकारली होती.





