संशोधन क्षेत्रात अनेक गोष्टींचे संशोधन कायमच चालू असते.भारतावर मोगल असतील किंवा निजाम सत्ता असेल अशा अनेकांनी आपले वर्चस्व ठेवले होते.पण त्यांच्या सत्तेचे प्राचीन अवशेष ईथेच कायम अबाधित राहिले आहेत. हजारो वर्षांनी संशोधनातून पुरातत्व शास्त्रांच्या हाती भारतातील काही ठीकाणचे अवशेष सापडत आहेत. सोलापूरमधील बोरामनी गवताळ प्रदेशात भातातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह सापडला आहे. दोन हजार वर्षांच्या प्राचीन रोमन संस्कृतीच्या खूणा यात दिसून आल्या आहेत. या भागात रोम सत्ता साम्राज्य होते.त्यांचे व्यापारी धोरण होते.लहान दगडापासून बनवलेल्या या चक्कव्यूहात अनेक काड्यांच्या मातीचा एक वेगळा थर आहे.जो अनेक वर्ष अबाधित राहू शकतो. हे सगळं इतिहास संशोधकांच्या अभ्यासातून दिसत आहे.यासाठी पुण्याचे कातळशिल्प अभ्यासक सचिन पाटील यांना या भारतातील सगळ्यात मोठ्या पंधरा रिंग असलेल्या चक्रव्यूहाच्या संशोधनासाठी पाचारण करण्यात आले होते.
Last Updated: Dec 23, 2025, 15:04 IST


