'प्रत्येक बॉल सिक्स गेला पाहिजे नाहीतर...', वडिलांनी दिली होती धमकी, CSK च्या 14.20 कोटींच्या खेळाडूचा शॉकिंग खुलासा!

Last Updated:

CSK Young Star Kartik Sharma : मी लहान असल्यापासून त्यांनी मला सांगितलं होतं की, प्रत्येक बॉल स्टेडियममध्ये पोहोचायला हवी, असं कार्तिक म्हणाला.

Kartik Sharma reveals My father would threaten
Kartik Sharma reveals My father would threaten
Kartik Sharma reveals : इंडियन प्रीमियर लीगच्या मिनी-लिलावात पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने 14.20 कोटी रुपयांना खरेदी केल्यानंतर 19 वर्षीय कार्तिक शर्माला अश्रू अनावर झाले होते. कार्तिक आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मानधन घेणारा अनकॅप्ड खेळाडू बनला आहे. अशातच आता एका मुलाखतीमध्ये बोलताना चेन्नईचा युवा स्टार कार्तिक शर्माने मोठा खुलासा केलाय.
एवढ्या कमी वयात तुझ्यात सिक्स हिटिंगची कला कशी जमली? असा सवाल समालोचक जतीन सपरू याने विचारला. त्यावर कार्तिक शर्माने उत्तर दिलं. माझ्या वडिलांनी माझ्याकडून तयारी करून घेतली होती. त्यांना आक्रमक बॅटिंग आवडते. बॉल जर डिफेन्स केला तर मी तुला मारेन, असं धमकी माझ्या वडिलांन मला दिली होती, असं कार्तिक शर्मा म्हणाला.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Jatin Sapru (@jatin_sapru)



advertisement
माझे वडील नेहमी म्हणायचे प्रत्येक बॉल मारून खेळायचा. मी लहान असल्यापासून त्यांनी मला सांगितलं होतं की, प्रत्येक बॉल स्टेडियममध्ये पोहोचायला हवी, असं कार्तिक म्हणाला. त्यावर समालोचक जतीनने प्रश्न केला की, वडील सांगत होते पण कोचने सांगितलं नाही का? की डिफेन्स कर... हळू खेळ किंवा आणखी काही... त्यावर कार्तिक म्हणतो, दिवसा डिफेन्सचा सराव करत होते तरी देखील वडील रात्री फक्त सिक्स मारण्याचा सराव घ्यायचे, म्हणून मी आज इथंपर्यंत पोहोचू शकलो, असं कार्तिक म्हणाला.
advertisement
कार्तिकच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले की एकदा तो कार्तिकसोबत ग्वाल्हेरमध्ये एका स्पर्धेत खेळण्यासाठी गेला होता तेव्हा पैसे संपले अन् त्यांना हॉटेल सोडून रात्रीच्या निवारामध्ये राहावे लागले आणि रात्र उपाशी काढावी लागली. नंतर, संघाने अंतिम सामना जिंकला. कार्तिकला क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी कर्जही घेतले. त्यांनी एक बॉलिंग मशीन विकत घेतली आणि त्याला सराव करायला लावला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'प्रत्येक बॉल सिक्स गेला पाहिजे नाहीतर...', वडिलांनी दिली होती धमकी, CSK च्या 14.20 कोटींच्या खेळाडूचा शॉकिंग खुलासा!
Next Article
advertisement
Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement