विठ्ठल भक्तांसाठी खूशखबर, नववर्षातील पूजेसाठी 26 डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी, संपूर्ण माहिती
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vitthal Rukmini Pooja: पंढरीच्या पांडुरंगाची नवीन वर्षात पूजा करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी लवकरच सुरू होणार आहे. भाविकांना नवीन वर्षात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या महापूजा, पाद्यपूजा व इतर प्रकारच्या पूजा करता येतील.
सोलापूर- विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या महापूजा, पाद्यपूजा व इतर प्रकारच्या पूजा ऑनलाइन पद्धतीने 26 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यास विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवैद्य अशा सर्व प्रकारच्या पूजा मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 जून 2025 रोजी बैठक झाली होती. तेव्हा या पूजा भाविकांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. यासाठी संगणक प्रणाली देखील विकसित करण्यात आली आहे. https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून भाविकांना पूजेची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्य पूजा साठी 25 हजार रुपये व 11 हजार रुपये, पाद्यपूजेसाठी 5 हजार रुपये, तुळशी अर्चन पूजेसाठी 2100 रुपये तर महानैवैद्य सहभाग योजनेसाठी 7 हजार रुपये इतके देणगी मूल्य आहे.
advertisement
1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2026 कालावधीत सण उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवैद्य सहभाग योजना तसेच 01 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये तुळशी अर्चन पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
advertisement
पूजेचे बुकिंग अधिकृत संकेतस्थळावरच करावे. तसेच अटी व शर्ती देखील अधिकृत संकेतस्थळावर मंदिर समितीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 10:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
विठ्ठल भक्तांसाठी खूशखबर, नववर्षातील पूजेसाठी 26 डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी, संपूर्ण माहिती









