TRENDING:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना दिली जाणारी 'चौरंग' शिक्षा नेमकी काय?, VIDEO

Last Updated:

ही शिक्षा महाराजांनी कुणाला दिली व ही शिक्षा कशाप्रकारे दिली जात होती, यासंदर्भात अधिक माहिती सोलापूरचे ‘शिवचरित्र’कार डॉ. शिवरत्न शेटे यांनी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. बदलापूरच्या घटनेमुळे राज्य हादरले. आंदोलने झाली, सरकारकडून कारवाईचे अश्वासन देण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना 'चौरंग' शिक्षा दिली जात होती. ही शिक्षा महाराजांनी कुणाला दिली व ही शिक्षा कशाप्रकारे दिली जात होती, यासंदर्भात अधिक माहिती सोलापूरचे ‘शिवचरित्र’कार डॉ. शिवरत्न शेटे यांनी दिली.

advertisement

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांवरती अत्याचार झाला की तो सहन केला जायचा नाही. महाराजांच्या काळात एक घटना घडली होती. रांझे गावच्या बाबर गुजर पाटलांनी एका सामान्य रयतेच्या मुलीवर अत्याचार केला. त्या मुलीच्या वडिलांनी लाल महालात येऊन आऊ साहेबाच्या समोर कैफियत मांडली. तसेच आऊ साहेब व बाळ शिवबा राजे यांनी एक निर्णय दिला. चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला तर या गुन्हेगाराचा चौरंगा करा.

advertisement

चौरंग शिक्षा म्हणजे हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कलम करण्यात येत होते. छत्रपती शिवाजी महाराज देत असलेल्या याच शिक्षेला 'चौरंग' शिक्षा असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेचा धाक इतका होता की, अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करण्याची हिंमत होत नव्हती. गैरकृत्याला माफी नाही. मग तो कोणीही असो. याची जाण सर्वांना यावी, यासाठी महाराजांनी ही कठोर अशी चौरंग शिक्षा दिली.

advertisement

बदलापूरच्या घटनेनंतर राज्यात भीतीचे वातावरण, महिला या वस्तू वापरुन करू शकतात स्वत:चे संरक्षण, महत्त्वाच्या टिप्स, VIDEO

‘शिवचरित्र’कार डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितले की, मल्लवा देसाईचे एक प्रकरण आहे. धारवाडजवळ बेलवडी जिंकण्यासाठी त्यांचा मेहुणा सखुजी गायकवाड यांच्यावर शिवाजी महाराज यांनी जबाबदारी दिली होती. पती मृत्यू पावल्यानंतर मल्लवा यांनी लढाई सुरुच ठेवली होती. त्यांनी पुरुष वेशाधारी स्त्री सैन्यही मैदानात उतरवले होते.

advertisement

महाराज मैदानात उतरल्यानंतर बेलवडीच्या सैन्यानी माघार घेतली. सुखोजी गायकवाड याने काही सैन्यास कैद करुन रात्रभर मराठा छावणीत ठेवले होते. त्यामध्ये मल्लवा यांचाही समावेश होता. सखुजी यांनी मल्लवा यांच्यावर वाईट नजर ठेवली. हे छत्रपती शिवाजी महाराज यांना समजले.

Badlapur Case : अन्याय, अत्याचाराविरोधात नेमकी काय भूमिका घ्यायची? पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा Video

छत्रपतींच्या राज्यात शिरसत्याप्रमाणे स्त्रियांना मराठा सैनिकांनी पकडणे हा मोठा गुन्हा मानले जायचे. हा गुन्हा करणारा छत्रपतींचा मेहुणा होता. महाराजांनी त्यांनाही सोडले नाही. सुखोजी गायकवाड यांचे डोळे काढण्याची शिक्षा दिली. महाराजांनी मल्लवा यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सावित्रीचा खिताब देऊन गौरव केला. त्याशिवाय तिचे राज्य तिला परत दिले. इतकेच नव्हे तर तिच्या मुलाला मांडीवर घेऊन राजेंनी दूध पाजले. मल्लवा यांना राजेंनी बहीण मानले. यानंतर मल्लवा यांनी छत्रपतींचा पुतळा तयार केला. ते शिल्प आजही आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

ज्याप्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 दिवसात चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला आणि रांजे गावच्या पाटलांचा चौरंगा केला होता. तसेच लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करून आरोपींना शिक्षा द्यावी, असे मत डॉ. शिवरत्न शेटे यांनी व्यक्त केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना दिली जाणारी 'चौरंग' शिक्षा नेमकी काय?, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल