Badlapur Case : अन्याय, अत्याचाराविरोधात नेमकी काय भूमिका घ्यायची? पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा Video

Last Updated:

सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्या म्हणाले की, बदलापूर याठिकाणी जी घटना घडलेली आहे, ती अतिशय निंदनीय आहे. त्या घटनेचा मी तीव्र निषेध करते.

+
बदलापूर

बदलापूर प्रकरणातील आरोपी

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता बदलापूरमधील घटनेने महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये आणि इतरही मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी पालकांनी नेमकी कशी भूमिका घ्यावी, त्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी लोकल18 च्या टीमने विशेष आढावा घेतला.
advertisement
सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्या म्हणाले की, बदलापूर याठिकाणी जी घटना घडलेली आहे, ती अतिशय निंदनीय आहे. त्या घटनेचा मी तीव्र निषेध करते. आपण दररोज ऐकतो की, कुठे ना कुठेतरी, कोणत्या ना कोणत्या मुलीवर तरी अन्याय, अत्याचार होतो. पण या विरुद्ध पालकांनी भूमिका घेणे गरजेचे आहे. आपल्या घरात मूल जन्म येणार आहे, हे माहीत असल्यापासूनच पालकांनी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
advertisement
आपल्या घरात मुलगी जन्माला आली की, तेव्हापासूनच तिला आपण समाजातील चांगल्या वाईट गोष्टींची शिकवण द्यायला हवी. त्यासोबतच आपल्या मुलांनी पालकांनी समाजातील चांगला वाईट गोष्टी या सांगायला हव्यात. जसे की बॅड टच आणि गुड टच हे देखील आपल्या पालकांनी आपल्या मुलींना अगदी लहान वयापासून सांगायला सुरुवात करायला हवे.
advertisement
त्यासोबतच एखाद्या मुलीला जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत नसेल किंवा त्या व्यक्तीची कुठली गोष्ट आवडत नसेल, तर त्याक्षणी त्या मुलीने सांगायला पाहिजे की, मला ही गोष्ट आवडत नाही किंवा मला हा व्यक्ती आवडत नाही. न घाबरता आपल्या आई-वडिलांना तिने याबाबत सांगायला हवे. आई-वडिलांनीही तिच्या या मताचा आदर करायला हवा आणि तुला समजून घेतले पाहिजे. तसेच इतरही चांगली शिकवण आपल्या मुलींना देणे पालकांनी गरजेचे आहे. तसेच जर कोणावर अत्याचार झाला असेल तर अशावेळी पालकांनी बदनामीच्या भीतीपोटी ही घटना कोणाला न सांगणे ही सर्वात मोठी चूक आहे.
advertisement
इंटरनेटवर बघून गर्भपाताची गोळी घेताय? असं करू नका, दुष्परिणाम भयंकर!
जर पालकांनी अन्याय अत्याचाराची घटना घडली असेल तर ती लपवून न ठेवतात्याविरुद्ध कठोर कारवाई करायला पाहिजे. कारण अत्याचार करणार हा सगळ्यात मोठा दोष असतो आणि त्यालाही शिक्षा व्हायलाच हवी. बदलापूर या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, ज्यातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यापेक्षा त्याला आयुष्यभर तसेच जेलमध्ये ठेवावे, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Badlapur Case : अन्याय, अत्याचाराविरोधात नेमकी काय भूमिका घ्यायची? पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement