Badlapur School case : बदलापुरातील हादरवणारी घटना, पुण्यातील तरुणींनी केल्या या महत्त्वाच्या मागण्या, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
बदलापूरच्या घटनेनंतर महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचबाबत पुण्यातील तरुणींना नेमकं काय वाटतं, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : बदलापूरातील नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभर एकच खळबळ उडाली. बदलापूरमध्ये मोठ्या जमावानं आंदोलन पुकारलं आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यानिमित्ताने महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचबाबत पुण्यातील तरुणींना नेमकं काय वाटतं, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
याविषयी बोलताना मुलींनी अनेक मुद्दे मांडले. मुलींच्या शाळेजवळच बस स्टॉपची सुविधा असणे फार गरजेचे आहे. तसेच शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे हे बंधनकारक असावे. त्याचप्रमाणे खेळासाठी मुली जेव्हा तर राज्य किंवा जिल्हात जातात तेव्हा त्यांची सुरक्षितता पाहून त्यांना पाठवावे. निर्भया पथक शहरामध्ये पुन्हा सुरू करावे. शाळेतील पटांगण, वर्ग या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे चालू असावे, अशी मागणी या युवतींनी लोकल18 शी बोलताना केली.
advertisement
इंटरनेटवर बघून गर्भपाताची गोळी घेताय? असं करू नका, दुष्परिणाम भयंकर!
घटनेमुळे शहरातील अनेक युवती तसेच विद्यार्थिनी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक शाळेत स्वसंरक्षण देणे महत्त्वाचे असून आपल्या मुलांनाही शाळेत पाठवताना या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रियाही या मुलींनी दिली.
जालन्यात याठिकाणी अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव, नागरिकांची तारेवरची कसरत, धक्कादायक परिस्थिती, VIDEO
advertisement
बदलापूरात संतप्त वातावरण -
बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको केला. सकाळपासून सुरू असलेलं हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू होतं. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे. तसंच बदलापूर बंदही करण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीबाबतची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली आहे. चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर संतप्त बदलापूरकरांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत रेल्वे मार्ग रोखून धरला होता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 21, 2024 7:33 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Badlapur School case : बदलापुरातील हादरवणारी घटना, पुण्यातील तरुणींनी केल्या या महत्त्वाच्या मागण्या, VIDEO