जालन्यात याठिकाणी अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव, नागरिकांची तारेवरची कसरत, धक्कादायक परिस्थिती, VIDEO

Last Updated:

नदीवरील पूल हा अत्यंत लहान असल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे आबालबद्धांना पूल पार करणे कठीण जात आहे मागील. विशेष म्हणजे, नदीवर मोठा पूल व्हावा, गावकऱ्यांनी मागील अनेक दिवसांपासून ही मागणी केली आहे. याबाबत लोकल18 हा आढावा.

+
घटनास्थळाचे

घटनास्थळाचे दृश्य

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : जालना जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी येण्यास देखील सुरुवात झाली आहे. मात्र, या नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. जालना जिल्ह्यातील धांडेगाव आणि उटवद या गावांमध्ये असणाऱ्या नदीला पूर आल्याने गावातील नागरिकांना गावाबाहेर पडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
advertisement
नदीवरील पूल हा अत्यंत लहान असल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे आबालबद्धांना पूल पार करणे कठीण जात आहे मागील. विशेष म्हणजे, नदीवर मोठा पूल व्हावा, गावकऱ्यांनी मागील अनेक दिवसांपासून ही मागणी केली आहे. याबाबत लोकल18 हा आढावा.
जालना मंठा रस्त्यापासून पाच किमी अंतरावर उटवद हे गाव आहे. या गावाच्या दुसऱ्या बाजूला धांडेगाव हे गाव आहे. या दोन गावा गावांच्या मध्ये नदी वाहते. पावसाळ्याच्या दिवसात नदीला पूर आल्यानंतर या दोन्ही गावातील नागरिकांबरोबरच आसपासच्या 10 ते 15 गावातील नागरिकांना पुलावरून ये-जा करणे शक्य होत नाही.
advertisement
अनेकदा जालना शहरात कामानिमित्त गेलेली लोक उटवद येथेच अडकून पडतात. तर अनेकांना धांडेगावकडून जालना शहरात कामानिमित्त जायचे असल्यास नदीला पूर आल्यानंतर धांडे गावातच अडकून पडावे लागते. अनेक वर्षांपासून ही समस्या असून या नदीवर अनेकदा पूल बांधण्यात आले. मात्र, पुराच्या पाण्यात ते वाहून गेले. सध्या बांधण्यात आलेला पूलही कमी उंचीचा असल्याने वृद्ध व्यक्ती तसेच लहान मुलांना या पुलावरून पूर असताना घेऊन जाणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.
advertisement
hand pump : घराशेजारच्या हातपंपाची माहिती मिळणार फक्त एका क्लिकवर, नेमकं काय कराल?
जालना शहराला कनेक्टिव्हिटी असलेले तब्बल 10 ते 15 गावे या पुलामुळे प्रभावित होत आहेत. नदीनाल्यांना पूर आल्याने या गावातील नागरिकांना जालना शहरात येणे जिकरीचे होत आहे. लहान मुले तसेच वृद्धांना या पुलावरून रस्ता ओलांडणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष देऊन जास्त उंचीचा पूल या नदीवर बांधावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षांनीसुद्धा नागरिक मूलभूत सुविधांशी लढत आहेत, हे पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालन्यात याठिकाणी अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव, नागरिकांची तारेवरची कसरत, धक्कादायक परिस्थिती, VIDEO
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement