बदलापूरच्या घटनेनंतर राज्यात भीतीचे वातावरण, महिला या वस्तू वापरुन करू शकतात स्वत:चे संरक्षण, महत्त्वाच्या टिप्स, VIDEO

Last Updated:

महिलांच्या दैनंदिन वापरतल्याच अशा अनेक गोष्टी आहेत की, त्यामुळे त्या स्वतःचे संरक्षण करू शकतात. पाणी बॉटल, हेयर पिन, कानातील बाही, गाडीची चावी या वस्तूंचा वापर करुन महिला आपले संरक्षण करू शकतात. याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे -

+
कराटे

कराटे कोच तथा ब्लॅकबेल्ट चॅम्पियन सचिन कोकणे

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : बदलापूरच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच्या काळात प्रत्येक स्त्री-मुलीने आपल्या शारीरिक सुरक्षेसाठी स्वत:चे स्वसंरक्षण करणे आणि संकटात असताना स्वतःला वाचवणे आवश्यक आहे. हे एक कौशल्य आहे, जे बहुतेक स्त्रिया कधीच शिकत नाहीत किंवा शिकवले जात नाहीत. त्यामुळेच याचबाबत आपण आज अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
advertisement
सेल्फ डिफेन्स ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक स्त्रीला तिचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. महिलांना कोणत्याही धोक्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याची शक्ती आणि क्षमता देते. जेव्हा एखाद्या महिलेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होतो तेव्हा आपल्याकडे दोन पर्याय असतात. एकतर त्याच्याशी लढा किंवा त्याला शरण जा. या प्रकरणात, आपण त्या धोकादायक परिस्थितीतून बाहेर पडू शकता आणि स्वतःचे संरक्षण करू शकता, असा सेल्फ डिफेन्सचा अर्थ आहे.
advertisement
Badlapur Case : अन्याय, अत्याचाराविरोधात नेमकी काय भूमिका घ्यायची? पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा Video
आजकाल समाजात महिलांवरील वाढता अत्याचार पाहता महिलांनी याविरोधात लढण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सेल्फ डिफेन्स शिकण्याची वेळ आली आहे. याबाबत नाशिक येथील कराटे कोच तथा ब्लॅकबेल्ट चॅम्पियन सचिन कोकणे यांनी काही संरक्षण नियम सांगितले.
advertisement
महिलांच्या दैनंदिन वापरतल्याच अशा अनेक गोष्टी आहेत की, त्यामुळे त्या स्वतःचे संरक्षण करू शकतात. पाणी बॉटल, हेयर पिन, कानातील बाही, गाडीची चावी या वस्तूंचा वापर करुन महिला आपले संरक्षण करू शकतात. याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे -
  1. कार वाइपर - ही स्टेप शिकण्यासाठी, दोन्ही तळवे कार वायपरसारखे एकत्र ठेवा आणि तुमचे अंगठे मागे टेकवा. जर कोणी तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रथम तुमचे शरीर एका बाजूला वळवा. हाताचा वायपर बनवण्यासाठी तुमचे हात जोडून घ्या आणि हल्लेखोराला मारण्यासाठी तुमचे हात फिरवण्यासाठी सर्व शक्ती वापरा.
  2. वन हँड कॅच - जर एखाद्या व्यक्तीने तुमचा एक हात आपल्या हाताने धरला तर सर्वात आधी तुम्ही त्याच्या हाताची पोझिशन बघून आपल्या अंगठ्याने मुठ बंद करा. आता तुमचा हात सोडण्यासाठी त्या व्यक्तीच्या हातामध्ये म्हणजे स्ट्रिंगवर दबाव टाकायचा आहे. जेव्हा एखादा हल्लेखोर तुमचा हात पकडतो, तेव्हा त्याच्या हाताची 'डोर' पोझिशन तुमच्या हाताच्या वरच्या बाजूला असते. त्यामुळे तुम्हाला 'डोरवर' पूर्ण दाब देऊन तुमच्या कानाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा लागतो, जेणेकरून हल्लेखोराची बोटे ओपन होतील.
  3. होल्डिंग फ्रॉम बॅक - जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल की, तुमच्या कंबरेला धरून कोणीतरी पकडण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुमचे लांब करा आणि दोन पायांमध्ये जागा करा. आता खाली वाकून स्क्वॅट स्थितीत जा. दोन्ही हात आपल्या पायांमधील जागेतून घेऊन हल्लेखोराचे दोन्ही पाय अशा प्रकारे पुढे खेचा की हल्लेखोर आपला तोल गमावून खाली पडला पाहिजे. यामुळे तुम्हाला तेथून सुरक्षितपणे बाहेर पडण्याची संधी मिळेल. अशा काही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्यावर येणाऱ्या धोकादायक प्रसंग सहज हाताळू शकतात.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
बदलापूरच्या घटनेनंतर राज्यात भीतीचे वातावरण, महिला या वस्तू वापरुन करू शकतात स्वत:चे संरक्षण, महत्त्वाच्या टिप्स, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement