आठ ते दहा मिनिटांत गोविंदचा मृत्यू
गोविंद बर्गे याने त्याच्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. बर्गे याने उजव्या कानशिलावर पिस्तूल ठेवलं अन् गोळी झाडून घेतली होती.. पिस्तुलातून सुटलेली गोळी थेट त्यांच्या उजव्या बाजूने आत डोक्यात शिरली होती आणि डाव्या डोळ्याच्या भुवईचा वरचा भाग आणि कानाच्यामधून बाहेर पडली होती. गोळी लागल्यानंतर गोविंद बर्गे ड्रायव्हिंग सीटवर एका बाजूला पडला आणि त्यानंतर आठ ते दहा मिनिटांत त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
गाडीत बिअरचं कॅन, AC सुरू अन्...
गोविंद बर्गे हा 8 सप्टेंबरला रात्री बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील पूजाच्या घरी गेला होता. त्यानंतर 9 सप्टेंबरला पूजाच्या घरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या गाडीत बर्गे याचा मृतदेह सापडला होता. त्याच्या गाडीत बिअरचं कॅन देखील सापडलं होतं. पण त्याच्या गाडीची बॅटरी आणि डिझेल संपलं होतं. आत्महत्या करताना गोविंदने गाडी सुरू ठेवली होती. तर त्याच्या गाडीच्या काचा देखील लावलेल्या होत्या. गाडीचा एसी देखील चालू होता, अशी माहिती समोर आली आहे.
न्यायालयीन कोठडी वाढवली
दरम्यान, सदर प्रकरणात प्रेयसी पूजा गायकवाडवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पूजाची अटक केली असून तिची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी फोन कॉल डिटेल्स आणि चॅट तपासले असून त्यात धमकीचे मेसेज आढळले आहेत. मध्ये गोविंद बर्गे याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे. विवाहित असताना देखील गोविंदने आत्महत्या करण्याआधी बायकोचा आणि आई-वडिलांचा विचार केला नाही, इथंच गोविंदरावांचा पिंजरा झाला, अशी चर्चा आहे.