Govind Barge Case : उपसरपंचाचा 'पिंजरा' कसा झाला? पूजाचा 'खेळ' तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होता! गोविंदरावांची चूक कुठं झाली?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Solapur Barshi Govind Barge Case : सदर प्रकरणात प्रेयसी पूजा गायकवाडवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पूजाची अटक केली असून तिची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.
Beed Crime Govind Barge Death : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 38) यांच्या संशयास्पद मृत्यूने मोठी खळबळ उडाली होती. सोलापूर-बार्शी मार्गावरील एका गावात काळ्या रंगाच्या कारमध्ये त्यांच्या डोक्यात गोळी लागलेला मृतदेह आढळला होता. हे प्रकरण सुरुवातीला आत्महत्या मानले जात असले तरी, पोलीस तपासात याला एक वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे माजी उपसरपंच गोविंद बर्गेची 'पिंजरा' सिनेमाप्रमाणे अवस्था झाली, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कॉल डिटेल्स आणि चॅट तपासले
सदर प्रकरणात प्रेयसी पूजा गायकवाडवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पूजाची अटक केली असून तिची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी फोन कॉल डिटेल्स आणि चॅट तपासले असून त्यात धमकीचे मेसेज आढळले आहेत. मध्ये गोविंद बर्गे याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे.
advertisement
इथंच गोविंदरावांचा पिंजरा झाला
पुजाने गोविंदची धमकी गांभिर्याने घेतली नाही तेव्हाच गोविंदला पूजाचा खरा रंग समजायला हवा होता. पुजाने प्रॉपर्टी नावावर करण्याचा आग्रह धरला त्याचवेळेस गोविंदने कुटूंबियांचा विचार करायला हवा होता, असं गोविंदच्या जवळच्या व्यक्तींनी म्हटलं आहे. विवाहित असताना देखील गोविंदने आत्महत्या करण्याआधी बायकोचा आणि आई-वडिलांचा विचार केला नाही, इथंच गोविंदरावांचा पिंजरा झाला, अशी चर्चा आहे.
advertisement
कुटुंबियांकडून घातपाताचा संशय
दरम्यान, पूजाच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांनी स्वत:च स्वत:वर पिस्तूलमधून गोळी झाडून घेतली. पण गोविंदच्या नातेवाईकांकडून, कुटुंबियांकडून घातपाताचा संशय व्यक्त होतोय, त्यावर पोलिस काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 16, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Govind Barge Case : उपसरपंचाचा 'पिंजरा' कसा झाला? पूजाचा 'खेळ' तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होता! गोविंदरावांची चूक कुठं झाली?