सोलापूर - आधुनिक काळात भारतीय युद्धकला लोप पावतेय का? असा प्रश्न निर्माण होतो. पण सोलापुरात रूद्रशक्ती गुरुकलच्या वतीने शिवकालीन वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला जातोय. सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल येथे मुलींना मर्दानी खेळ आणि शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जातेय. याबाबत मुलींना प्रशिक्षण देणारे विवेक मिस्किन यांनी अधिक माहिती दिली आहे.
advertisement
स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण
सोलापुरात रुद्रशक्ती गुरुकुलच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून मुलींना शिवकाळीन खेळ आणि स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. सकाळी 6 वाजलेपासून मुलींना लाठी-काठी, पट्टा, भाला, खंजीर लढत, तलवार, द्वंद्वयुद्ध आदींचे प्रशिक्षण देण्यात येतं. स्वरंक्षणासाठी ही युद्धकला शिकण खूप महत्त्वाचं असतं. सोबतच मुली व महिलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठीही ते तितकचं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुलींनी शिवकालीन शस्त्रकला शिकून घ्यावी, असं आवाहनही मिस्किनने केलीय.
सोलापुरातील सृष्टीची कमाल!, वय फक्त 13 वर्षे, पण तब्बल 10 तासांहून अधिक वेळ फिरवली लाठी
शिवकालीन शस्त्रकला शिकल्याने कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर संयम ठेवण्याची सवय होते. शस्त्र शिकल्यामुळे आपल्यातील ताकदीची जाण होते. प्राचीन युद्धकलेत पारंगत झाल्यामुळे आत्मविश्वास वाढून महिला सशक्तीकरणालाही बळ मिळते. त्यामुळे सर्व वयातील महिला व मुलींनी शिवकालीन शस्त्रकला शिकावी. आतापर्यंत गुरुकुलच्या वतीने 7 हजारांहून अधिक महिला आणि मुलींना मोफत प्रशिक्षण दिल्याचंही मिस्किन सांगतात.
दरम्यान, महिलांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शिवकालीन कला शिकणे गरजेची आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनाही चाप बसेल. तसेच प्रशिक्षणामुळे महिला व मुलींच्या छेडछाडीलाही निश्चित आळा बसेल, असं मत विवेक मिस्किन यांनी व्यक्त केलंय.