सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘डीजीसीए’कडून स्टार एअरला परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्याशीही स्टार एअरचा करार झाला आहे. त्यामुळेच लवकरच ही विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, प्रत्यक्ष विमान उड्डाण कधी?
महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटीसोबत स्टार एअरचा करार झाल्याने सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता गणेशोत्सवकाळातच बुकिंग सुरू होणार असून साधारणत: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातच विमानाचे पहिले उड्डाण होईल, असे सांगितले जातेय. ही विमानसेवा सुरू झाल्याने सोलापूरचा औद्योगिक, व्यापारी, पर्यटन आणि शैक्षणिक विकास होण्यास चालना मिळेल.
advertisement
दरम्यान गेल्या जून महिन्यात सोलापूर – गोवा विमानसेवेला प्राऱंभ झाला. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. विजयपूर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशंना गोव्याला जाण्यासाठी ही विमानसेवा सोयीची ठरत आहे.
