advertisement

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, प्रत्यक्ष विमान उड्डाण कधी?

Last Updated:

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.2 टन मालवाहतूक केली जाईल.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, प्रत्यक्ष विमान उड्डाण कधी?
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, प्रत्यक्ष विमान उड्डाण कधी?
नवी मुंबई : नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळ उभारलं जात आहे. या विमानतळाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित व्हावं, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार या विमानतळाचं उद्घाटन सप्टेंबरऐवजी ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. ऑक्टोबरमध्ये उद्घाटन होऊनही पहिल्या टेकऑफसाठी मात्र डिसेंबर उजाडणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैमध्ये विमानतळाची पाहणी केली होती. सर्व कामं सप्टेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त नवरात्रीत म्हणजे सप्टेंबरमध्ये असेल, अशी चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास 30 सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र, आता हा मुहूर्त किंचित पुढे गेला आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले की, उद्घाटन झाल्यानंतर हे विमानतळ केंद्राच्या सीआयएसएफकडे सोपवण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण होताच डिसेंबरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं विमान उड्डाण होईल.
advertisement
2 हजार 866 एकर क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्वात अगोदर इंडिगो एअरलाईन्स सेवा देणार आहे. या विमानतळावरून दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.2 टन मालवाहतूक केली जाईल.
सद्यस्थितीत या विमानतळाचं 94 टक्क्यांहून अधिक कामं पूर्ण झालं आहे. विमानतळ मार्गावर सुरू असलेले रस्ते, उड्डाणपूल, टेकडी, अटल सेतू मार्गाकडे जाणारा मार्ग, धावपट्टी, उभारलेले टॉवर ही कामं झपाट्याने पूर्ण होत आहेत. या विमानतळाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि उद्घाटनही त्यांच्याच हस्ते होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, प्रत्यक्ष विमान उड्डाण कधी?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement