Summer Healthy Drink : मास्टरशेफ्सनाही आवडली बिना साखरेची थंडगार लस्सी! 10 मिनिटांत होते तयार, पाहा रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Sugarless lassi recipe in marathi : उन्हाळ्यात आपल्याकडे बरेच थंड पेय बनतात. त्यात संपूर्ण हिवाळ्यात आपल्या वेगवेगळ्या टेस्टच्या ड्रिंक्स ट्राय करायला मिळाल्या तर..? आज आम्ही तुमच्यासाठी अशीच रिफ्रेशिंग आणि वेगळ्या चवीची भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहोत.
मुंबई : उन्हाळ्यात आपली तब्येत सांभाळणं म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणं आणि शरीराचं तापमान सांभाळणं. या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला भरपूर पाणी आणि थंड पेय पिणं गरजेचं असतं. आपल्याकडे बरेच थंड पेय बनतात. त्याचसोबत आपण नारळ पाणीही पीत असतो. त्यात संपूर्ण हिवाळ्यात आपल्या वेगवेगळ्या टेस्टच्या ड्रिंक्स ट्राय करायला मिळाल्या तर..?
आज आम्ही तुमच्यासाठी अशीच रिफ्रेशिंग आणि वेगळ्या चवीची भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहोत. हा लस्सीचाच प्रकार आहे आणि मास्टर शेफ्सनाही तो खूप आवडला आहे. शिवाय तो खूप हेल्दीही आहे. आज आपण बनवणार आहोत. बिना साखरेची लस्सी. याची रेसिपी nbs_kitchen_tales या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली गेली आहे.
बिना साखरेची थंडगार लस्सी बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- दही
advertisement
- सुका मेवा
- बडीशेप
- गूळ पावडर
- आलं
- पुदिन्याची पाने
- मीठ
- पाणी
बनवण्याची सोपी पद्धत..
- लस्सी बनवण्यासाठी सर्वात आधी बडीशेप हलकी भाजून घ्या.
- नंतर मिक्सरच्या भांड्यात, भाजलेली बडीशेप, आलं, गूळ, मीठ, पुदिन्याची पानं, बर्फाचे तुकडे आणि थोडंसं दही घाला.
- हे मिश्रण व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
advertisement
- आता एका मातीच्या किंवा कोणत्याही भांड्यात दही घाला त्यामध्ये हे बारीक केले मिश्रण घाला.
- यामध्ये बर्फाचे तुकडे, चिरलेले काजू, बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून मिक्स करा.
- आता एका ग्लासमध्ये थंड असतानाच सर्व्ह करा.
advertisement
ही लस्सी तुम्हाला अगदी फ्रेश करेल आणि चवही भन्नाट येईल. शिवाय यामध्ये साखर नसल्यामुळे ती तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनते. तर या उन्हाळ्यात ही बिना साखरेची हेल्दी लस्सी नक्की ट्राय करून पाहा. घरातल्या लहान मुलांनाही खूप आवडेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 1:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Healthy Drink : मास्टरशेफ्सनाही आवडली बिना साखरेची थंडगार लस्सी! 10 मिनिटांत होते तयार, पाहा रेसिपी








