हळदीच्या दिवशी स्वत:ला संपवलं
प्रकाशचे सुजित जमादार याच्याशी प्रेमसंबंध होते पण दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सुजितला एका तरुणीवर जीव जडला आणि सुजितने प्रकाशशी लग्नही केलं होतं. आठ वर्षांपासून प्रकाश आणि स्विटी पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते. मात्र, सुजित जमादार आता दुसरे लग्न करण्याचा विचार करत होता. प्रियकराने दिलेल्या या धक्क्यातून स्विटी सावरू शकली नाही आणि तिने सुजितच्या हळदीच्या दिवशी स्वत:ला संपवलं.
advertisement
गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवे
सुजित आणि तृतीयपंथी प्रकाश कोळी (स्विटी) यांच्यात प्रेमसंबंध होते. सुजित जमादार हा तृतीयपंथी प्रकाशच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत असताना आणि पायात जोडवे घालतानाचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
मला मारहाण केली, मला त्रास दिला
नात्यातील एका तरुणाने माझ्यासोबत लग्न केलं. त्याने मला मारहाण केली, मला खूप त्रास दिला. मी सगळं सहन केले आणि आता तो मला सोडून दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करत आहे. त्यामुळे मी जीव देत आहे, असं सांगितल्यानंतर प्रकाश कोळीने गळफास घेतला.
सुजित जमादार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, लव्ह ट्रँगलमध्ये अडकलेल्या स्विटीने गुरुवारी प्रियकराच्या हळदीच्या दिवशी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्रियकर सुजित अप्पासाहेब जमादार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
