TRENDING:

Solapur News: अक्कलकोट 'स्वामी समर्थ मंदिर'च्या वेळेमध्ये बदल; दर्शनासाठी आता मिळणार अधिक वेळ, असे आहे नवीन वेळापत्रक

Last Updated:

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सणांच्या दिवसांमध्ये भाविकांसाठी दर्शनाच्या वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात राज्यासह देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यामध्ये सलग तीन दिवस सण असल्यामुळे मंदिर दोन तास भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. सलग सणांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर समितीने भाविकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर 24 तास नाही तर, सलग 22 तास मंदिर उघडं राहणार आहे.
News18
News18
advertisement

येत्या आठवड्यात तीन दिवस महत्त्वाचे सण आहेत. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच, गुरूवार (19 मार्च) गुढीपाडवा, शुक्रवार (20 मार्च) स्वामी समर्थ प्रकट दिन, शनिवार (21 मार्च) रमजान ईद आणि रविवार (22 मार्च) असे चार दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे मंदिर रात्रीच्या वेळी बंद असणार आहे. सलग तीन दिवस (गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार) सणांच्या पार्श्वभूमीवर स्वामी समर्थ मंदिर मध्यरात्री 12 ते 2 बंद ठेवण्याच्या निर्णय अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर समितीने घेतला आहे. राज्यभरातून आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांसाठी 22 तास स्वामींचे दर्शन खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावरचं ‘ते’ पोस्टर पाहिलं, लेकासाठी आईनं मंगळसूत्र विकलं; मराठमोळा विक्रम भारताचा फिटनेस ब्रँड अम्बॅसिडर, Video
सर्व पहा

दरम्यान, अलीकडेच त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरातील सुरक्षारक्षकाने भाविकाला केलेल्या मारहाणीचा प्रकार ताजाच असताना अक्कलकोट मंदिर प्रशासनाने काळजी घेतली आहे. गुढीपाडवा, स्वामी समर्थ प्रकट दिन, रमजान ईद आणि रविवार असे चार दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे मंदिर प्रशासनाने मंदिराच्या वेळेमध्ये आणि पुरूष- महिलांसाठी स्वतंत्र रांगेच सोय करण्यात आली आहे. दरम्यान, भक्तांची संभाव्य गर्दी लक्षात घेता महिला आणि पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांगेची सोय करण्यात आली आहे. जर तुम्ही सुद्धा या सुट्टीच्या दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्याच्या विचारात असाल तर एकदा ही बातमी आवश्य वाचा.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: अक्कलकोट 'स्वामी समर्थ मंदिर'च्या वेळेमध्ये बदल; दर्शनासाठी आता मिळणार अधिक वेळ, असे आहे नवीन वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल