दरम्यान, गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा गायकवाडने गोविंद बर्गे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक लूट केली होती. तिने बार्शी परिसरात बर्गे यांच्या पैशांतून पावणे दोन गुंठे जमीन घेतल्याची माहिती अलीकडेच समोर आली होती. या जमीन खरेदीखतावर साक्षीदार म्हणून पूजाच्या भावाने सही केल्याचं देखील समोर आलं आहे.
advertisement
आता पोलिसांनी पूजा गायकवाडची कुंडली काढायला सुरुवात केली आहे. पूजा गायकवाड माजी उपसरपंच गोविंद बर्गे याच्यासह आणखी कुणाशी बोलत होती? तिचं कुणाशी अफेअर होतं का? ती कुणाच्या संपर्कात होती का? याची डिटेल माहिती काढण्यासाठी पोलिसांनी ट्रॅप टाकला आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप मॅसेजिंगचा डेटा मागवला आहे. यामुळे पूजा आणखी कुणाच्या संपर्कात होती. गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात तिचा काय सहभाग होता, याचा तपशील समोर येणार आहे.
याशिवाय गोविंद बर्गे यांनी ज्या पिस्तूलमधून स्वत:वर गोळी झाडल्याचा दावा केला जातोय. ते पिस्तूल कुणाचं होतं? याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांनी संबंधित विभागाकडे मागवली आहे. आज पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे हीच कारणं सांगून पोलीस पुन्हा एकदा पूजाची पोलीस कोठडी मागू शकतात. आता तिला पोलीस कोठडी मिळणार की तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.