सोलापूर : राज्यातील महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सोलापूर शहरातील दमाणी नगरात राहणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. यामुळे महायुती सरकारने राबवलेल्या या योजनेचा महिलांकडून कौतुक केले जात आहे. याबाबत लाभार्थी महिला छाया गंगणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
advertisement
एकमेकांच्या तोंडात लाडू भरून आनंद साजरा -
दमाणी नगरात राहणाऱ्या महिलांना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर मेसेज आला. त्यांचा बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 3 हजार रुपये जमा झाले असल्याचे मेसेज आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा होताच महिलांनी दमाणी नगरात एकमेकांच्या तोंडात लाडू भरून आनंददेखील साजरा केला. पहिला आणि दुसरा असे एकत्रित 2 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. या मिळालेल्या पैशातून मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार असल्याची माहिती महिलांनी दिली.
राज्यात आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 40 हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास 1 कोटी 36 लाख पात्र महिला आहेत. अजुनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेल्या महिलांनाही जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत.
रक्षाबंधनाची सरकारकडून महिलांना खास भेट मिळत आहे. पात्र महिलांना राज्य सरकार तीन हजार रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानुसार, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे. तो हप्ता थेट बँक खात्यात जमा होत आहे.