सोलापूर : केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, ही म्हण सर्वांनीच ऐकली असेल. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजेच लातूर येथील राहुल रामलिंग सगर हा तरुण आहे. त्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर लातूर येथून सोलापुरात येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि सोलापुरातच आरोग्यसेवक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. आता राहुल सगर या तरुणाची सोलापुरात आरोग्यसेवक म्हणुन निवड झाली आहे. नेमका त्याचा हा प्रवास कसा झाला, याचबाबत जाणून घेऊयात.
advertisement
राहुल रामलिंग सगर (वय 29, रा. लातूर) असे या तरुणाचे नाव आहे. राहुल सगर याचे शिक्षण लातूर येथे झाले आहे. त्याच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. राहुलचे वडील गवंडी काम करायचे. तर राहुल हा एका खासगी दूध डेअरीत काम करत होता. काम करत करत त्याने शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
यानंतर स्पर्धा परीक्षेचे तयारी करत असताना रेल्वेमध्ये ग्रुप डीसाठी अर्ज केला होता. मैदानी चाचणी देण्यासाठी तो सोलापुरात आला होता. सोलापुरातील रेल्वे ग्राउंड येथे त्याची मैदानी चाचणी होती. मैदानी चाचणीचे निकाल वेटींगला पडल्याने तो सोलापूर येथील विजापूर नाका येथील एका हॉस्टेलमध्ये राहिला.
सणानिमित्त गोड पदार्थ खात असाल तर दातांना होईल त्रास, नेमकी काय काळजी घ्यावी?, VIDEO
सोलापुरातच राहुन त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सोलापुरात एका खासगी कंपनीत काम करत त्याने सोबतच स्पर्धा परिक्षेची तयारी केली आणि कामाच्या पैशातून रुम भाडे, जेवणाचा खर्च, स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके याचा खर्च उचलला.
यासोबतच वडिलांकडून येत असलेले पैसेही त्याने स्पर्धा परीक्षेसाठीच वापरले. तो दररोज अभ्यासिकामध्ये बसून 8 ते 10 तास अभ्यास करायचा. अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न आहे. आता आरोग्यसेवक झालो आहे. तर लवकरच अधिकारीसुद्धा होईल, असा निश्चय त्याने केला आहे. त्याचा हा प्रवास निश्चितच स्पर्धा परिक्षा देणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.