काय सांगता! शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीनची उंची चक्क माणसापेक्षाही जास्त, जालन्यात नेमकं काय घडलं?, VIDEO

Last Updated:

जालना जिल्ह्यातील दहिफळ या गावातील सुदाम चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातील हे सोयाबीन पीक आहे. जून महिन्यामध्ये पाऊस झाल्यानंतर त्यांनी आपल्या 2 एकरच्या क्षेत्रावर अंकुर 335 या वाणाची पेरणी केली. याबाबत लोकल18 चा हा ग्राउंड रिपोर्ट.

+
सोयाबीन

सोयाबीन पीक जालना

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : सोयाबीन हे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. साधारणपणे 2 ते अडीच फुटांपर्यंत सोयाबीनची वाढ होत असते. मात्र, जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन चक्क 5 फुटांपेक्षाही अधिक उंचीचे वाढले आहे. त्यामुळे या सोयाबीनला शेंगाच लगडलेल्या नाहीत. चक्क माणसाच्या उंचीपेक्षाही अधिक उंची या सोयाबीनची झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत लोकल18 चा हा ग्राउंड रिपोर्ट.
advertisement
जालना जिल्ह्यातील दहिफळ या गावातील सुदाम चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातील हे सोयाबीन पीक आहे. जून महिन्यामध्ये पाऊस झाल्यानंतर त्यांनी आपल्या 2 एकरच्या क्षेत्रावर अंकुर 335 या वाणाची पेरणी केली. सोयाबीनची उगवण क्षमता चांगली राहिल्याने पीक बहरात आले. पिकाला आवश्यकता असेल त्याप्रमाणे पाऊस देखील होत होता. मात्र, काही दिवसांनी चौधरी यांच्या लक्षात आलं की, सोयाबीनची वाढ ही आवश्यकतेपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे त्यांनी 35 दिवसानंतर एकदा आणि 55 दिवसानंतर एकदा अशी दोन वेळा वाढ रोखण्यासाठी सोयाबीनवर फवारणी केली. मात्र, या फवारणीचाही फारसा परिणाम सोयाबीनच्या वाढीवर झाला नाही.
advertisement
माळरानावर असलेले पीक सतत पडणाऱ्या पावसाने एवढ्या उंचीचे वाढले की, त्याने माणसापेक्षाही जास्त उंची गाठली. जवळपास 5 फुटांपेक्षा ही अधिक उंचीचे सोयाबीन सुदाम चौधरी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाढले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. इतरही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची उंची ही वाढलेली असून अडीच ते 3 फुटांपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नामध्ये 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता सर्व शेतकरी वर्तवत आहेत. मात्र, या शेतकऱ्याचे सोयाबीन थेट 5 फुटांपर्यंत वाढल्याने केवळ 30 ते 40 टक्केच उत्पन्न हातात येईल, असे शेतकरी सुदाम चौधरी यांनी सांगितले.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही दोन एकर क्षेत्रावर या सोयाबीनची लागवड केली होती त्याच्यावर दोन फवारण्या वाढ रोखण्यासाठी करण्यात आल्या. मात्र, तरीदेखील सोयाबीनची उंची ही 5 फुटांपेक्षा जास्त झाली आहे. या सोयाबीनला शेंगाही लगडलेल्या नाहीत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून आम्हाला हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही त्यांचा मुलगा रघुनाथ चौधरी यांनी केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
काय सांगता! शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीनची उंची चक्क माणसापेक्षाही जास्त, जालन्यात नेमकं काय घडलं?, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement