सर्वाधिक जादा फेऱ्या पुणे प्रदेशात
या जादा बसफेऱ्यांपैकी सर्वाधिक 292 फेऱ्या पुणे प्रदेशातून मंजूर करण्यात आल्या आहेत. तर, नागपूर प्रदेशात सर्वात कमी, म्हणजे केवळ 4 जादा फेऱ्या चालवल्या जातील. या काळात प्रवाशांसाठी सर्व आरक्षण केंद्रे आणि वाहतूक नियंत्रण कक्षात 4 आणि 7 दिवसांचे पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
advertisement
दिवाळीच्या काळात प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एकूण 2 हजार 32 चालक आणि वाहक अतिरिक्त सेवा देणार आहेत. या काळात त्यांची सुट्ट्यांवर नियंत्रण आणले जाणार आहे, तर पर्यवेक्षकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तर सुट्ट्याच देऊ नयेत, असे आदेश महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहेत.
ST Bus Services
प्रवाशांच्या सोयीसाठी सूचना
महामंडळाची प्रतिमा उंचावण्यासाठी बसस्थानकांचा परिसर, प्रसाधनगृहे, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि बसेस स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, बसस्थानकांचे सुशोभीकरण करून दिवाळीत रोषणाई करण्याचे आदेशही सर्व विभागांना देण्यात आले आहेत, जेणेकरून प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील.
हे ही वाचा : Marathwada Weather: विजा कडकडणार, पाऊस कोसळणार, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना अलर्ट
हे ही वाचा : विजांचा कडकडाट-वाऱ्यांचा कहर, 4 जिल्ह्यांमध्ये अलर्ट, पुढचे 3 दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा