दरम्यान, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावासाठी तिथल्या स्थानिक भूमीपुत्रांनी आंदोलने केली होती. विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव दिले जावे, अशी मागणी स्थानिक भूमीपुत्रांची होती. आगरी- कोळी समाजासाठी दि.बा.पाटील यांचे फार मोठे योगदान आहे. नवी मुंबईचे मुळचे रहिवासी असलेल्या दि.बा.पाटील यांचे त्या भागासाठी विशेष योगदान आहे. त्यांचा प्रकल्पाग्रस्तांसाठीचा लढा कोणीही विसरू शकत नाही. आज इथले भूमीपूत्र दि.बा.पाटील यांच्यामुळे स्थिरावले आहेत. त्यांचे योगदान हे प्रत्येक क्षेत्रात राहिले आहे. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. दि.बा.पाटील यांचे प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष योगदान असल्याने नवी मुंबई विमानतळाला त्यांचेच नाव दिले जावे अशी मागणी स्थानिकांनी घेतली.
advertisement
दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या बाहेर दि.बा.पाटील नगरी असे बॅनरही आतापासूनच झळकू लागले आहेत. आगरी कोळी समाजाने विमानतळाच्या नावाची मागणी आधी पासूनच लावून धरली आहे. सरकारलाही निवेदन दिले आहेत. मोर्चे ही काढण्यात आले. तसे झाले नाही तर विमानतळ चालू देणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आला. आता हे विमानतळ काही दिवसात कार्यान्वित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्य सरकार त्याबाबत पाठपुरावा करत आहे. केंद्र सरकार आणि हवाई वाहतूक मंत्रालय ही या नावासाठी अनुकूल आहे. त्यांनीही दिबा यांच्या नावासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे नाव देण्याची प्रक्रिया ही शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर, दि. बा यांचं विमानतळाला नाव देण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.