कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये वेळवट्टी परिसरातील उंबराचे पाणी नावाच्या शेतामध्ये पट्टेरी वाघाचं दर्शन झालंय. या तालुक्यामध्ये दोन वाघांच वास्तव्य आहे या दोन वाघांपैकी एक वाघ मानवी वस्तीत शिरू लागल्यान नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलेल आहे. दरम्यान वनविभागाकडून या वाघाचा शोध घेण्याच कार्य चालू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत जंगल क्षेत्राकडे जाऊ नये, असं आवाहन वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी यांनी केलय.
advertisement
आजरा तालुक्यातील वेळवट्टी परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राणे यांचे घर आहे. या घराच्या बाजूला असणाऱ्या काजूच्या बागेमध्ये झाडाच्या फांदीवर हा वाघ पहुडलेला त्यांना दिसला. त्यावेळी डॉक्टर राणे हे बंगल्याच्या भोवती असलेल्या झाडांना पाणी घालत होते. त्यांच्यासोबत असलेला कुत्रा बागेच्या दिशेने भुंकू लागला. म्हणून त्यांनी त्यांच्याजवळ असलेली टॉर्च त्या दिशेने भिरकावल्यानंतर काजूच्या मोठ्या झाडावर आडव्या फांदीवर हा पट्टेरी वाघ झोपल्याच त्यांच्या लक्षात आल. टॉर्च टाकल्यानंतर त्यांना सुरुवातीला मांजरासारखा प्राणी असल्याच त्यांना दिसलं. मात्र कुत्रा हा जोरात भुंकू लागल्याने त्यांच्या वाघ असल्याचं लक्षात आलं.
वाघाने जनावरे केली फस्त
आजरा तालुक्यात असणाऱ्या या दोन वाघांपैकी एक वाघ हा मानवी वस्तीत शिरू लागलाय. त्यांनी तालुक्यातील किटवडे, सुळेरान, गवसे या परिसरातील 5 पाळीव जनावरांची शिकार करून फस्त केले आहेत. वनविभागाची शोधू मोहीम चालू असताना वनविभागाच्या कॅमेरामध्ये हे दोन्हीही वाघ दिसले आहेत. तसेच 31 डिसेंबरला किटवडे परिसरातील पथक जंगलामध्ये गस्त घालण्यासाठी गेले होते. मात्र वाघाच्या थरारक डरकाळीमुळे हे पथक माघारी परत आले होते. हे दोन्हीही वाघ दिवसा आणि रात्री दोन्हीही वेळ मोठमोठ्याने डरकाळी देतात. यांची डरकाळी साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर ऐकू येते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे. सध्या जंगलात अन्न व पाणी मिळत नसल्याने ते नागरी वस्तीसह शेतातील वस्तीजवळ येत आहेत. तालुक्यातील जंगलात दोन पट्टेरी वाघ असल्याचे वनविभागाच्या निरीक्षणास आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगलाक्षेत्रामध्ये कोणत्याही कारणासाठी जाऊ नये, असं आवाहन वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी यांनी केले आहे.
आता वाघाचीही दहशत
कोल्हापूरातल्या चंदगड, आजरा तालुक्यात गवे आणि हत्तींचा मोठ्या प्रमाणात वावर पाहायला मिळतो. इथं असलेल्या घनदाट जंगलामुळे या ठिकाणी विविध प्राण्यांचा वावर पाहायला मिळतो. अनेक वेळा खाण्याच्या तसेच पाण्याच्या शोधात हेच प्राणी मानवी वस्तीकडे वळतात. शिवाय इथे दोन पट्टेरी वाघांचं वास्तव्य आहे. हे दोघेही वाघ हळूहळू मानवी वस्तीकड वळत आहेत. त्यामुळे अशावेळी वनविभागाने तत्काळ मानवी वस्तीत शिरण्यापूर्वी त्यांचा त्यांच्या मूळ अधिवासात पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






