TRENDING:

ZP Teacher: हे फक्त झेडपी शाळेतच घडू शकतं, सरांसाठी पोरं ढसाढसा रडली, Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

Last Updated:

ZP Teacher: मानेगाव खालसा या गावातील एका घटनेनं सर्वांना जिल्हा परिषद शाळांची सकारात्मक बाजू दाखवली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळा आणि त्या शाळेतील शिक्षकांबद्दल नकारात्मक चित्र निर्माण झालेलं आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील मानेगाव खालसा या गावातील एका घटनेनं सर्वांना जिल्हा परिषद शाळांची दुसरी बाजू दाखवली आहे. आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली झाली म्हणून विद्यार्थ्यांनी शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लोकल 18ने विद्यार्थी, पालक आणि केंद्रप्रमुखांशी संवाद साधला.
advertisement

मालेगाव खालसा गावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संतोष नागवडे आणि मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांची बदली झाली. या दोन शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी या बदलीला विरोध केला आहे. मानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या केवळ 37 वरून तब्बल 152 पर्यंत पोहोचवण्याचं श्रेय संतोष नागवडे आणि मुख्याध्यापक कुलकर्णी यांना जातं. शाळेतील विद्यार्थी इस्रोच्या सहलीसाठी पात्र ठरावेत आणि नवोदय सारख्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावेत, यासाठी या दोन शिक्षकांनी फार प्रयत्न केलेले आहेत. शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण यामुळे या शिक्षकांची परिसरात ओळख निर्माण झाली होती.

advertisement

‎Corruption: शिक्षिकेने ओढणी झटकली अन् मुख्याध्यापक जाळ्यात अडकला, छ. संभाजीनगर शिक्षण विभागात खळबळ

शिक्षकांच्या बदलीने व्यथित झालेली विद्यार्थीनी म्हणाली, "आता मी काय बोलणार? आमचे सर आम्हाला मध्येच सोडून गेले. नागवडे सरांसारखं आम्हाला कोणीही शिकू शकत नाही. आमची एकच मागणी आहे की आम्हाला आमचे सर पुन्हा द्या." एक पालक म्हणाले, "राज्य सरकारने जून महिन्यामध्येच शिक्षकांच्या बदलीचा निर्णय घ्यायला हवा होता. तसे झाले असते तर आम्ही आमच्या मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवलं असतं. आता मध्येच शिक्षकांची बदली झाल्याने आमची देखील गोची झाली आहे."

advertisement

"आमच्या शाळेतील शिक्षकांची बदली रद्द व्हावी यासाठी आम्ही विविध ठिकाणी पाठपुरावा करत आहोत. तरीदेखील सरांची बदली थांबली नाही त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी मिळून असा निर्णय घेतला आहे की विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं नाही. या निर्णयाला विद्यार्थ्यांची देखील संमती आहे. नागवडे सर आणि कुलकर्णी सर यांची पुन्हा फेरनियुक्ती मानेगाव येथे होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही," अशी माहिती मानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण जाधव यांनी दिली.

advertisement

केंद्रप्रमुख अरुण देशमुख म्हणाले की, शासनाच्या धोरणानुसार दोन शिक्षकांची बदली झाली आहे. गावकऱ्यांनी या संदर्भात आम्हाला निवेदन दिलं आहे. वरिष्ठ स्तरावर सकारात्मक पद्धतीने विचार व्हावा आणि यातून मार्ग निघावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गावकऱ्यांनी देखील आडमुठी भूमिका न घेता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून सहकार्य करावे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP Teacher: हे फक्त झेडपी शाळेतच घडू शकतं, सरांसाठी पोरं ढसाढसा रडली, Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल