TRENDING:

राज ठाकरेंच्या घरासमोर उभे राहून सुजात आंबेडकरांचं चॅलेंज, मनसेवर सडकून टीका

Last Updated:

वंचित बहुजन आघाडीने (VBA) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर 'संविधान सन्मान महासभा' आयोजित केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कृष्णा औटी, प्रतिनिधी, मुंबई : मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यांवरून वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी मनसेला डिवचले. मनसेने मशिदींवरचे भोंगे काढण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्या मधली हवा काढायच काम हे वंचित बहुजन आघाडीने केले होते. हे त्यांच्या घरासमोर उभा राहून बोलतोय, असे सुजात आंबेडकर म्हणाले. त्यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सुजात आंबेडकर-राज ठाकरे
सुजात आंबेडकर-राज ठाकरे
advertisement

वंचित बहुजन आघाडीने (VBA) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर 'संविधान सन्मान महासभा' आयोजित केली होती. या सभेला प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेकर, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर तसेच पक्षाचे सर्वच नेते पदाधिकारी उपस्थित होते.

सुजात आंबेडकर यांची थेट राज ठाकरे आणि मनसेवर टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशि‍दीवरील भोंगे काढण्याचे आंदोलन केले. त्यावेळी मनसेच्या भोंग्यामधील हवा काढण्याचे काम वंचितच्या कार्यकर्त्यांनी केले, हे राज ठाकरे यांच्या घरासमोर उभा राहून बोलतोय, असे आवेशात सुजात आंबेडकर म्हणाले. त्यांनी मशि‍दीवरील भोंग्याचा मुद्दा छेडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

advertisement

आमच्या मंचावर टिपू सुलतान, असेल हिम्मत तर कारवाई करा

दुसरीकडे टिपू सुलतानचा फोटो स्टेटसवर टाकल्याने राज्यात दंगा होऊन पोलिस तक्रारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनी रोखठोकपणे उजव्या विचारसरणीच्या लोकांना आव्हान दिले. आम्ही आमच्या मंचावर टिपू सुलतानचा फोटो लावला आहे, हिम्मत असेल तर कारवाई करून दाखवा, अॅक्सन घेऊन दाखवा, असे खुले चॅलेंज सुजात आंबेडकर यांनी दिले.

advertisement

भाजप आणि आरएसएसला रोखण्याची ताकद आंबेडकरवाद्यांमध्येच

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलटफेर, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मनुवादी शक्तींना हरवण्याची क्षमता केवळ आणि केवळ आंबेडकरवाद्यांमध्येच आहे, असे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडी हा RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढणारा पहिला राजकीय पक्ष असल्याचेही ते म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज ठाकरेंच्या घरासमोर उभे राहून सुजात आंबेडकरांचं चॅलेंज, मनसेवर सडकून टीका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल