TRENDING:

दादांना जाऊन २ महिने, मन अजूनही त्यांच्याच आठवणींमध्ये गुंतलंय, सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Last Updated:

अजित पवार यांच्या अपघाताला आज बरोबर २ महिने झाले. मात्र दादांची आठवण आल्याशिवाय एक दिवसही जात नाही. त्यांच्या आठवणीत मन अजूनही गुंतून राहिलंय, अशी भावनिक पोस्ट सुनेत्रा पवार यांनी लिहिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : "आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते", अशी भावनिक पोस्ट राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीत लिहिली आहे.
अजित पवार-सुनेत्रा पवार
अजित पवार-सुनेत्रा पवार
advertisement

अजित पवार यांच्या अपघाताला आज बरोबर २ महिने झाले. मात्र दादांची आठवण आल्याशिवाय एक दिवसही जात नाही. त्यांच्या आठवणीत मन अजूनही गुंतून राहिलंय, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांवर पोस्ट लिहून दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच पक्षाध्यक्ष म्हणून राजकीय निर्णय घेताना तुम्ही संबंधित परिस्थितीत काय निर्णय घेतला असता हे स्मरून मी निर्णय घेत असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

advertisement

दादा तुम्ही फक्त नेते नव्हता तर....

तुमच्यातील लोकाभिमुख - विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.

advertisement

तुमची पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला टोचतीये

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते. तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते.

advertisement

दादा तुमच्या सोबतची प्रत्येक आठवण मनात कोरलीये

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून घेतली माहिती, नोकरी सोडून उभारला बिस्किट व्यवसाय, महिन्याला 2 लाख रुपयांची उलाढाल
सर्व पहा

पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते. दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांना जाऊन २ महिने, मन अजूनही त्यांच्याच आठवणींमध्ये गुंतलंय, सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल