TRENDING:

दादांच्या आवडत्या शहराला मिळालं गिफ्ट, उपमुख्यमंत्री झाल्यावर २४ तासानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली राजकीय प्रतिक्रिया

Last Updated:

अजित पवार यांच्यावरील सर्व धार्मिक कार्यक्रम आटपूनच मंत्रालयात पाऊल ठेवण्याचे सुनेत्रा पवार यांनी ठरवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या महिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेतल्यानंतर त्या तडक बारामतीला गेल्या. अजित पवार यांच्यावरील सर्व धार्मिक कार्यक्रम आटपूनच मंत्रालयात पाऊल ठेवण्याचे त्यांनी ठरवले आहे. शपथ घेतल्यानंतर २४ तासांनी त्यांनी पहिली राजकीय प्रतिक्रिया दिली.
अजित पवार-सुनेत्रा पवार
अजित पवार-सुनेत्रा पवार
advertisement

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पुणे शहरांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवंगत नेते अजित पवार यांचा गृहजिल्हा असलेल्या पुण्याबाबत अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्यात आल्याने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सीतारामन यांचे कौतुक केले आहे.

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करत असताना सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा युवककेंद्रित, शेतकरीहिताचा आणि सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे.

advertisement

मुंबई–पुणे कॉरिडरची घोषणा, सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्थमंत्री सीतारामन यांचे कौतुक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या संदेशात म्हणाल्या की, केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी व रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत केलेल्या ठोस तरतुदी भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या ठरणार आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी जाहीर झालेल्या मेट्रो प्रकल्पांसाठीच्या तरतुदी, मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, तसेच मुंबई–पुणे व पुणे–हैदराबाद उच्चगती रेल्वे कॉरिडॉरच्या घोषणेमुळे राज्याच्या विकासाला नवी गती मिळेल. शहर विकास, नदी पुनरुज्जीवन, कृषी व्यवसाय नेटवर्क आणि ग्रामीण जोडसुधार प्रकल्पांसाठी मिळालेला निधी महाराष्ट्राच्या समतोल विकासाला बळ देणारा आहे.

advertisement

औषधे स्वस्त, सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी ४० हजार कोटींची तरतूद

आरोग्य क्षेत्रातील बायोफार्मा धोरण, कॅन्सर व मधुमेहावरील औषधे स्वस्त करण्याचा निर्णय, तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी ४० हजार कोटींची तरतूद ही भारताच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरेल. हा अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निर्णायक ठरेल, असे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

advertisement

मुंबई-पुणे रेल्वे कॉरिडॉर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

महाराष्ट्रातील मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणखी गतिमान होणार आहे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांच्या आवडत्या शहराला मिळालं गिफ्ट, उपमुख्यमंत्री झाल्यावर २४ तासानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली राजकीय प्रतिक्रिया
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल