नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी जवळपास एक तासाची बैठक झाली. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये जे नाराजी नाट्य सुरू होतं. त्यानिमित्ताने ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दोन तासं ही बैठक सुरू होती. त्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बाहेर पडले. पण, या बैठकीमध्ये काय चर्चा झाली. याची तपशील अद्याप समोर आली नाही.
advertisement
सुनेत्रा पवार पटेल-तटकरेंवर नाराज
पण, त्याआधी गुरुवारी सकाळी सुनेत्रा पवार संसद भवनात दाखल झाल्या होत्या. पण या वेळी ना त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल होते ना प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे पाहायला मिळाले. खरं तर गेल्यावेळी सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यावेळी हे दोन्ही नेते आवर्जून हजर होते. पण या वेळी मात्र पटेल-तटकरेंनी दांडी मारल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रफुल्ल पटेलांच्या अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना विचारलं असता तुम्हालाच माहिती असेल, 'ते कधी येतात आणि कधी जातात. मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही', असं म्हणत त्यांनी थेट उत्तर देणं टाळलंय. मात्र यावरून सुनेत्रा पवार तटकरे आणि पटेलांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
