TRENDING:

Sunetra Pawar : अजित पवार गटाच्या नेत्यांची 'ती' गुप्त बैठक अन् शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची इनसाइड स्टोरी

Last Updated:

Sunetra Pawar vs Sharad Pawar: अजित पवार यांच्या निधनाला तीन दिवस पूर्ण होत असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या हालचाली करत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घडवून आणला. मात्र, ही घटना फक्त शपथविधीपर्यंच मर्यादित नाही.

advertisement
मुंबई: राज्याच्या राजकारणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनाला तीन दिवस पूर्ण होत असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या हालचाली करत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घडवून आणला. मात्र, ही घटना फक्त शपथविधीपर्यंच मर्यादित नसून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धोबीपछाड देण्यासाठी राष्ट्र्वादीच्या काही नेत्यांनी वेगवान हालचाली केल्याची चर्चा सुरू आहे.
अजित पवार गटाच्या नेत्यांची 'ती' गुप्त बैठक अन्  शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची इनसाइड स्टोरी
अजित पवार गटाच्या नेत्यांची 'ती' गुप्त बैठक अन् शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची इनसाइड स्टोरी
advertisement

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सावरण्यासाठी आणि शरद पवारांच्या 'विलीनीकरणाच्या' रणनीतीला शह देण्यासाठी पडद्यामागे अत्यंत वेगवान हालचाली झाल्या. बारामतीतील 'सहयोग सोसायटी' ते मुंबईतील 'देवगिरी' बंगला यादरम्यान घडलेला हा राजकीय थरार केवळ सत्तेसाठी नव्हता, तर तो अस्तित्वाच्या लढाईचा भाग असल्याचे समोर आले आहे.

advertisement

शरद पवारांचा 'विलीनीकरण' डाव आणि नेत्यांचा विरोध

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय झाले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करून सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, अजित पवार गटातील छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना हे मान्य नव्हते. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या अंत्यविधीवेळी सर्व सूत्रे हाती घेणे या नेत्यांना खटकले होते. शरद पवारांना वेळ दिल्यास आपला गट पूर्णपणे संपून जाईल, अशी भीती या नेत्यांना होती.

advertisement

फडणवीसांसोबत गुप्त बैठक आणि 'चकवा'

याच धास्तीपोटी प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन सत्रात दीड तास चर्चा झाल्यानंतर बाहेर पडताना पटेलांनी "अद्याप नेता ठरलेला नाही" असे सांगून शरद पवार गटाला गाफील ठेवले. शरद पवारांना वाटले की अद्याप वेळ आहे, पण त्याच वेळी राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यामार्फत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासाठी राजी करण्याची फिल्डिंग लावली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.

advertisement

रातोरात बारामती सोडली अन्...

शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदासाठी तयार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्या बाहेर पडण्यापूर्वी शरद पवारांशी चर्चा करतील, असा अंदाज 'गोविंदबाग'ला होता. पण मुंबईतून सूत्रे हलवणाऱ्यांनी वेगळीच योजना आखली होती. सुनेत्रा पवारांना तातडीने बारामतीबाहेर काढण्यात आले. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला. सुनेत्रा पवारांच्या हालचाली, त्या कोणत्या ठिकाणी दाखल झाल्यात, याची माहिती पोलिसांच्या ताफ्याच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सुनेत्रा पवार ह्या बारामतीमधून रातोरात मुंबईत दाखल झाल्या आणि शपथविधीवर शिक्कामोर्तब झाले.

advertisement

पार्थ आणि जय पवारांची विभागलेली जबाबदारी

या संपूर्ण रणनीतीत अजित पवारांच्या दोन्ही मुलांवर महत्त्वाची जबाबदारी होती. जय पवार हे आई सुनेत्रा पवारांसोबत मुंबईत तळ ठोकून होते, तर पार्थ पवारांना मुद्दाम बारामतीतच थांबवण्यात आले होते. शनिवारी सकाळी जेव्हा शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन "मला शपथविधीबद्दल काहीही माहिती नाही" असे सांगितले, तेव्हा पार्थ पवार त्यांना भेटायला गेले. कौटुंबिक जिव्हाळा जपत राजकीय डावपेच खेळण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी वातावरणात मोठे बदल, हवामान खात्याकडून अलर्ट
सर्व पहा

सुनेत्रा पवारांच्या या शपथविधीने केवळ सत्तेचे समीकरण बदलले नाही, तर शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या प्रयत्नांना मोठा धक्का दिला आहे. आगामी काळात बारामती आणि मुंबईच्या राजकारणात राष्ट्रवादीतील 'पवार विरुद्ध पवार' असा संघर्ष होणार की आणखी नाट्यमय घडामोडी होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar : अजित पवार गटाच्या नेत्यांची 'ती' गुप्त बैठक अन् शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची इनसाइड स्टोरी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल