TRENDING:

Sunetra Pawar: नियम धाब्यावर, स्टिअरिंग तटकरेंच्या लेकाच्या हातात; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक?

Last Updated:

प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाहनाचं सारथ्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या घटनेमुळे प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली असून, उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
News18
News18
advertisement

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात विविध कार्यक्रम, बैठका आणि जनसंवाद उपक्रमांसाठी त्या सातत्याने प्रवास करत आहेत. एका लग्नासाठी त्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आल्या होत्या. या वेळी त्यांच्या शासकीय वाहनाचे चालक असताना देखील अनिकेत तटकरे यांनी चालकाला उतरवून स्वतः वाहन चालविल्याचे समोर आले आहे. सुनेत्रा पवार या पुढील सीटवर बसलेल्या असताना अनिकेत तटकरे यांनी स्टेरिंग हातात घेतल्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

advertisement

सुरक्षाव्यवस्थेत शिथिलता दाखवली गेली का?

विरोधकांनी या घटनेवरून  जोरदार हल्लाबोल केला आहे. उपमुख्यमंत्रीपदाच्या व्यक्तीला ‘झेड प्लस’ सुरक्षा असताना आणि शासकीय चालक उपलब्ध असताना खासगी व्यक्तीने वाहन चालविणे म्हणजे प्रोटोकॉलचा भंग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षाव्यवस्थेत शिथिलता दाखवली गेली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

advertisement

योग्य ती कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणामुळे सत्ताधारी गटाला अडचणीत आणणारी परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाकडून याबाबत खुलासा होण्याची मागणी केली जात आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षांवर वाढला भुरीचा प्रादुर्भाव? वेळीच करा रोग व्यवस्थापन, तज्ज्ञांचा सल्ला
सर्व पहा

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्रीपदासारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar: नियम धाब्यावर, स्टिअरिंग तटकरेंच्या लेकाच्या हातात; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल