TRENDING:

Supriya Sule 'आपली बाजू खरी असली तरी अन्याय...' राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाआधीच सुप्रिया सुळेंचे व्हॉट्स अॅप स्टेट्‍स चर्चेत

Last Updated:

Supriya Sule : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पुण्यात स्वतंत्रपणे वर्धापन दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांपेक्षा आधी सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (10 जून) 26 वा वर्धापन दिन मोठ्या राजकीय घमासानाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पुण्यात स्वतंत्रपणे वर्धापन दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांपेक्षा आधी सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
News18
News18
advertisement

शरद पवार गटाकडून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तर, अजित पवार गटाकडून बालेवाडी मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यंदाच्या वर्धापन दिनाआधीच दोन्ही गट एकत्र येतील असे म्हटले जात होते. मात्र, दोन्ही गटाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आजच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्या मुद्यावर भाष्य करणार, याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

advertisement

सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्स अॅप स्टेट्‍सची चर्चा...

या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्स अॅप स्टेट्‍स चर्चेत आले आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसद्वारे एकप्रकारे मनातील व्यथा मांडल्याचे दिसते. सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्स अॅप स्टेट्समध्ये, "सहन करायला शिक... आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो , आपण प्रयत्न करत रहायचे... आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो आपण काही करू शकत नाही... जेव्हा परिस्थिती , काळ, वेळ आपल्या सोबत नसते तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं .. कर्तव्य करत रहायचं..आपले संस्कार विसरायचे नाहीत .."

advertisement

सुळे यांचा हा भावनिक संदेश वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी व्हायरल झाला असून, तो अनेक अर्थांनी घेतला जात आहे. सत्तासंघर्ष, पक्षाची दुभंगलेली स्थिती, राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा, अशा विविध पार्श्वभूमीवर सुळे यांचे व्हॉट्स अॅप स्टेट्‍स चर्चेत आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supriya Sule 'आपली बाजू खरी असली तरी अन्याय...' राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाआधीच सुप्रिया सुळेंचे व्हॉट्स अॅप स्टेट्‍स चर्चेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल