TRENDING:

TET Exam : शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य, दिवाळीच्या सुट्टीत करा जोमात अभ्यास; नापास झालात तर..

Last Updated:

शालेय शिक्षण विभागाने 2013 पासून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीईटीची परीक्षा देणं बंधनकारक केलं आहे. पण आता न्यायालयाने सर्वच शिक्षकांना टीईटीची परीक्षा देणं बंधनकारक केलं आहे. शिक्षक जर टीईटी परीक्षा उत्तीर्ण नाही झाले तर त्यांना नोकरीतून निवृत्ती घ्यावी लागणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राज्यातल्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाटीईटी परीक्षेची घोषणा केली होती. सध्या टीईटी परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. टीईटी परीक्षा 23 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. पण परीक्षेच्या काळामध्ये शिक्षकांसाठी एक डोकेदुखी आहे. ऐन दिवाळीच्या काळातच टीईटीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे शिक्षिकांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने 2013 पासून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीईटीची परीक्षा देणं बंधनकारक केलं आहे. पण आता न्यायालयाने सर्वच शिक्षकांना टीईटीची परीक्षा देणं बंधनकारक केलं आहे.
शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य, दिवाळीच्या सुट्टीत करा जोमात अभ्यास; नापास झालात तर..
शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य, दिवाळीच्या सुट्टीत करा जोमात अभ्यास; नापास झालात तर..
advertisement

'संसार वाहून गेला, रस्त्यावर आलो, सरकार मात्र झोपेत!' पुरग्रस्त महिलेचा टाहो

पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षकांसाठी ही टीईटीची परीक्षा बंधनकारक असते. ही परीक्षा येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार असून ऐन दिवाळीच्या काळातच शिक्षकांना टीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षक मंडळी विद्यार्थांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अभ्यास देताना दिसतात. पण आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थांना नाही तर शिक्षिकांना अभ्यास करावा लागणार, हे नक्की. ऐन दिवाळीच्या काळातच टीईटीची परीक्षा होत असल्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये शिक्षकांना अभ्यासाचे धडे गिरवावे लागणार आहेत. टीईटीची परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वीच परीक्षा संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

दिवाळीच्या स्वप्नांची होळी! अतिवृष्टीने नदी फुटली, 5 एकर कपाशी पाण्यात, शेतकरी हतबल, Video

राज्यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांची संख्या तब्बल 87 हजार 440 इतकी आहे. या शाळांमध्ये एकूण 4 लाख 79 हजार शिक्षक शिकवायला आहेत. त्यातील अंदाजे 1 लाख 49 हजार शिक्षकांना टीईटी परिक्षा द्यावी लागणार आहे. धक्कादायक म्हणजे, 53 वर्ष वय असणार्‍या शिक्षकांना फक्त 2 वर्षातच टीईटी उर्त्तीण व्हावं लागणार आहे, जर वयाच्या 55 वर्षांपर्यंत शिक्षक टीईटीची परीक्षा उत्तीर्ण नाही झाले, तर त्यांना सेवानिवृत्ती सक्तीची करण्यात आली आहे. शिवाय, जर शिक्षकांना पदोन्नती हवी असेल, तर त्यांना टीईटीची परीक्षा देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ शिक्षकांना पुढे नोकरीसाठी फार विशेष मेहनत घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

महिलांनो ऑनलाइन अर्ज भरताना जपून; छोट्या चुकीमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाउंट

राज्यातल्या शिक्षकांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर 'टीईटी'ची अट घातल्याने सेवा ज्येष्ठ शिक्षकांऐवजी टीईटी उत्तीर्ण असलेला ज्युनिअर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे. त्यामुळे संघटना आणि शिक्षकांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय. दुसरीकडे शाळाबाह्य कामाच्या जबाबदारीने शिक्षक त्रस्त आहेत. निवडणूक आणि इतर कामांचा बोजा आहे. त्यात मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा ताण वाढल्याची तक्रार आहे. अशात टीईटी उत्तीर्ण होण्याची जाचक अट घातल्याने शिक्षकांचा मनस्ताप आणखी वाढलाय. अशा स्थितीत किती शिक्षक ही पात्रता परीक्षा गांभीर्याने घेतात आणि पास होतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
TET Exam : शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य, दिवाळीच्या सुट्टीत करा जोमात अभ्यास; नापास झालात तर..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल